इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात एमआरआय सुविधा, ब्लड बँक व नवीन इमारतींसह आवश्यक सेवा-सुविधांची लवकरच पूर्तता – आरोग्यमंत्र्यांची ग्वाही

इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात लवकरात लवकर एमआरआय सुविधेसह आवश्यक स्टाफ उपलब्ध करुन दिला जाईल. त्याचबराेबर रुग्णालयात साैरऊर्जा सिस्टीम बसविणे, नर्सिंग काॅलेज त्याचबराेबर स्टाफ निवासासाठी नवीन इमारत उभारणे, रुग्णालयात आवश्यक पाेलिस चाैकी व काेविड काळात काम केलेल्या कर्मचाèयांना शासकीय सेवेत कायमस्वरुपी सामावून घेण्यास आराेग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्याची पूर्तता तातडीने करण्याच्या सूचना केल्या. तसेच रुग्णालयात आवश्यक ब्लड बँक व रक्त विघटन केंद्रही सुरु करण्याचे सूताेवाच त्यांनी केले.


आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीवरुन इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील (आयजीजीएच) दीर्घकालीन समस्या, अपुरा स्टाफ, आवश्यक साेयी-सुविधा व रुग्णसेवेतील अडीअडचणी आदी विविध विषयांवर चर्चा करुन निर्णय घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक आराेग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मंत्रालयात साेमवारी बैठक झाली. बैठकीत प्रामुख्याने रुग्णालयात तीनशे बेडच्या प्रमाणात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करणे, रुग्णालयासाठी साैरऊर्जा सिस्टीम, प्रशिक्षण केंद्रासाठी नवीन अद्ययावत इमारत बांधणे, नर्सिंग काॅलेजसाठी इमारत बांधणे, स्टाफ निवासासाठी नवीन इमारत उभारणे, एम.आर.आय सुविधा, रुग्णालयात पाेलीस चाैकी, पिण्याच्या पाण्यासाठी आर.ओ. प्लांट बसवणे, प्रयाेगशाळासाठी मायक्राेस्काेप देणे (एच.एल.एल. र्माफत प्रयाेगशाळा प्रस्थापित करणे), ब्लड बँक व रक्त विघटन केंद्र उभारणे आणि काेविड काळात काम केलेल्या कर्मचाèयांना शासकीय सेवेत कायमस्वरूपी घेणे या विषयावर चर्चा झाली.
आमदार राहुल आवाडे यांनी, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे गाेरगरीब सर्वसामान्यांसाठी आधारवड बनले आहे. शासनाने या रुग्णालयास 300 बेडची मान्यता दिली असली तरी याठिकाणी आवश्यक ताे स्टाफ व अत्यावश्यक सेवा सुविधा उपलब्ध हाेणे गरजेचे आहे. त्याचबराेबर आवश्यक औषधांचा पुरवठा व त्यासाठी आवश्यक निधीची तातडीने उपलब्धता करुन द्यावी. याठिकाणी येणारा काेणताही रुग्ण विनाउपचार जाणार नाही यासाठी सर्व सुविधा, स्टाफ द्यावा, अशी मागणी केली.
आराेग्यमंत्री आबिटकर यांनी, नागरिकांना चांगल्या आराेग्य सुविधा उपलब्ध हाेण्यास शासन प्रयत्नशील असल्याचे सांगत इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातही आवश्यक एम.आर.आय. सुविधेसह ब्लड बँक व रक्त विघटन केंद्र प्राधान्याने दिले जाईल. त्याचबराेबर आवश्यक  स्टाफचीही पूर्तता करुन देऊ असे सांगितले.
बैठकीस आराेग्य सेवा काेल्हापूर मंडळ उपसंचालक डाॅ. दिलीप माने, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुप्रिया देशमुख, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिक्षक डाॅ. भाग्यरेखा पाटील, डाॅ. अमित साेहनी, अधिसेविका चारुशिल्पा येमल, रुग्ण कल्याण समिती सदस्य कपिल शेटके, विजय पाटील, सार्वजनिक आराेग्य विभागाचे सचिव, आराेग्य सेवा मुंबई आयुक्त, सहसंचालक रुग्णालये, अर्थ व प्रशासन, अधीक्षक अभियंता (पा.सु.वि.क), राज्य आराेग्य अधिकारी मुंबई यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित हाेते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *