कोरोची जिल्हा परिषद मतदार संघातून आमदार राहुल आवाडे यांची कन्या सानिका राहुल आवाडे यांना भारतीय जनता पक्षाने
जिल्हा परिषदेची उमेदवारी देण्यात आल्याची बातमी तारदाळ खोतवाडी व कोरोची परिसरात जोराने पसरली आहे त्यामुळे सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे
गतवर्षी तारदाळ येथील शाळेच्या जागेला कंपाउंड घालण्यावरून प्रसाद खोबरे व माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यामध्ये जोरदार वादावादी झाली होती एकमेकांना बघून घेण्याची भाषा ही वापरली गेली होती याचाच परिणाम म्हणून यावेळी जिल्हा परिषदेची प्रसाद खोबरे यांची सून प्रियंका प्रवीण खोबरे यांची उमेदवारी कापल्याची शंका तारदाळ वडी परिसरातून होत आहे तर आवाडे यांच्या घरातीलच उमेदवार द्यावा यासाठी तारदाळ व खोतवाडी परिसरातून काही नागरिकांनी आवाडे यांच्या घरातीलच उमेदवार द्यावा अशी मागणी केली होती या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर तिखट प्रतिक्रिया उमटल्या जात असून मागणी करणाऱ्या नागरिकांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे तर तारदाळ गावातील 100 हून अधिक गोरगरीब नागरिकांना जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी राहण्यासाठी घर बांधावे याकरिता कायदेशीर सनद देऊनजागा दिल्या होत्या या जमिनीवर आवाडे यांच्या सन्मती विद्यालयाने अतिक्रमण केले आहे व त्या जमिनी लाटले आहेत याबाबत गावातील नागरिकांनी अनेक वेळा आंदोलने केली आहेत परंतु आवडे यांच्या राजकीय ताकतीसमोर त्यांचा निभाव लागला नाही अशा भावना नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहे तर तारदाळ गावातील जमिनी लाटून उद्योगधंदे उभा केले तारदाळच्या जमिनीवर शाळा उभी केली परंतु गावातील एकाही व्यक्तीला त्या शाळेमध्ये नोकरीला घेतले नाही बीपीएड कॉलेज बंद पडले आहे तरीही अनेक एकर जमीन घशात घातले आहे आणि आता स्थानिक कार्यकर्त्यांना उमेदवारी न देता जिल्हा परिषद सदस्य पद ही आपल्याच घराकडे नेण्यासाठी आवाडे प्रयत्न करत असल्याने तारदाळ खोतवाडी परिसरातील नागरिकांच्या मनामध्ये संतापाची भावना उमटली आहे आज दिवसभर चौका चौकामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेत स्थानिक कार्यकर्त्यांना निवडणुकीमध्ये मिळणारी संधी हिरावून घेत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आमदार राहुल आवाडे यांच्या निर्णयामुळे कोरोची तारदाळ खोतवाडी गावातील नागरिकांमध्ये असंतोष असून याबाबत एकत्रितपणे विरोध करण्याच्या हालचालीला वेग आला आहे सोशल मीडिया वरून तिन्ही गावातील नागरिकांनी एकत्र येत एकच उमेदवार द्यावा अशी चर्चाही सुरू झाली आहे त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सानिका राहुल आवाडे यांना मोठा विरोध पत्करावा लागण्याची शक्यता आहे