आरोग्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात आरोग्य केंद्रांची दुरावस्था

कुंभोज तालुका हातकणंगले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची एक वर्षातच दुरावस्था झाली असून सदर डिलिव्हरी रूम मधील फरशा रात्री अचानक पडल्याने सदर बांधकामावर सध्या शंका व्यक्त होत आहे. जवळजवळ तीन कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या इमारतीतील भिताडाला लावण्यात आलेल्या फरश्या व अनेक ठिकाणी साईटला लावण्यात आलेल्या परश्या सध्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पडत असून याबद्दल ग्रामस्थातून नाराजीचे सुरमठत आहेत परिणामी सदर एखादी फरशी एखाद्या रुग्णांच्या किंवा डॉक्टरांच्या किंवा आरोग्य खात्यात कामाला असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडली तर त्याचे परिणाम काय होतील याची चर्चा सर्वत्र रंगत असून सदर कामाच्या ठेकेदारावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुंभोज ग्रामस्थातून सध्या जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *