हातकणगले प्रतिनिधी ता . २९ : आळते ग्रामपंचायती मध्ये सरपंचांचा अजब कारभार चालु असून या ठिकाणी बिअर बार परमिट रुम लॉजिंगना ठराव दिले जातात मात्र विरोधी गटाच्या सदस्यांना विकास कामांचे ठराव दिले जात नाहीत . असा आरोप विरोधी महाविकास परिवर्तन आघाडीचे विरोधी गट नेते जावेद मुजावर यांनी सोमवारी आळते ग्रामपंचायती समोर झालेल्या पत्रकार परिषदेत केलाआहे .
आळते प्राथमिक आरोग्य केंद्रास स्मार्ट पीएसी योजने अंतर्गत ४५ लाख रुपयांच्या निधीस फक्त प्रशासकीय मान्यता मिळाली आहे . याकामास इस्टीमेट , टेंडर व वर्क ऑर्डर शासनाने दिलेली नाही सत्ताधारी मंडळी मात्र याकामाचा शुभारंभ करून जनतेची दिशाभूल करत आहेत .
जल जीवन मिशन योजने अंतर्गत सुधारीत पाणी योजनेसाठी १ कोटी ६२ लाख रुपयांच्या कामांची वर्क ऑर्डर मिळून नऊ महिने होत आले , ठेकेदारांने साहित्यही आणून टाकले आहे मात्र सरपंच काम का करून देत नाहीत याचा खुलासा त्यांनी ग्रामस्था समोर करावा
सरपंचानी पदभार स्किकारल्या पासून १५व्या वित्त आयोगातून सुमारे तीन कोटी रुपये आले आहेत यातून केल्या जाणाऱ्या विकास कामांची उद्घाटने का केली जात नाहीत .
शासनाच्या स्वच्छ भारत योजने अंतर्गत सांड पाणी प्रकल्पासाठी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन सहा महिन्यापूर्वी वर्क ऑर्डर झाली आहे . अध्याप या कामाचा पत्ताच दिसून येत नाही .
गेल्या आठ महिन्या पासून प्रभारी ग्रामसेवकांच्याकडे पदभार आहे . ते पूर्ण वेळ देऊ शकत नसल्याने लोकांची काम खोळंबत आहेत . जिल्हा परिषेदेकडे पूर्ण वेळ ग्रामसेवक मिळावा म्हणून ठराव करून दिला जात नाही तसेच पुणे आयुक्तानी श्रीमती भाग्यश्री केदार यांची १२ डिसेंबरला ऑर्डर काढली आहे त्यांना महिला असल्याने हजर करून घेतले जात नाही .
विरोधी गटाच्या सदस्यांनी निधी आणून विकास कामे केली तर राजकीय नुकसान होईल या भितीपोटी त्यांना ठराव दिले जात नाहीत मात्र बिअरबार , परमिट रूम , लॉजिंग साठी ठराव दिले जातात असा अजब कारभार सध्या ग्रामपंचायतीमध्ये चालु आहे . ठेकेदारांनी वर्क ऑर्डर नसल्याली कोणतीही काम गावात करू नयेत अन्यतः त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल या सर्व प्रकारच्या कारभारांची जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्वरीत दखल घ्यावी अन्यतः त्यांच्या दालनात विरोधी परिर्वन विकास आघाडीचे सर्व सदस्य आत्मदहन करतील असा इशाराही यावेळी देण्यात आला . या पत्रकार परिषदेस विरोधी पक्षाचे गट नेते जावेद मुजावर , सुरेखा पाटील ,प्रा अशोक आळतेकर ‘ शिरीष थोरात , सुहास कांबळे , सद्धाम मुजावर , विलास कांबळे ,यांच्यासह विरोधी गटाचे बहुसंख्य समर्थक उपस्थित होते .