इचलकरंजी महानगरपालिका सभागृह नेतेपदी विठ्ठल चोपडे

इचलकरंजी महानगरपालिका सभागृह नेतेपदी सत्तारुढ भाजपच्या वतीने विठ्ठल पुंडलिक चोपडे यांची निवड करण्यात आली आहे. महापौर उदय धातुंडे या निवडीचे पत्र आज दिले. या निवडीने विठ्ठल चोपडे हे पहिले सभागृह नेते बनले आहेत.

महानगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत भाजप महायुतीन ६५ पैकी ४७ जागा जिंकत एकहाती सत्ता घेतली. सभागृहातील सर्वाधित मोठा पक्ष असलेल्या भाजपच्या गटनेतेपदी विठ्ठल चोपडे यांची निवड करण्यात आली. भाजपचे ४३ सदस्य असल्यामुळे सभागृह नेतेपदी विठ्ठल चोपडे यांची निवड करण्यात आली. आज त्यांच्या नियुक्तीचे पत्र देण्यात आले.

सत्तारुढ गट आणि प्रशासन यांच्यात त्याचबरोबर सत्तारुढ गट आणि विरोधी गट यांच्यात समन्वय साधण्याचे काम सभागृह नेता म्हणून श्री. चोपडे यांना करावे लागणार आहे. तसेच सत्तारुढ पक्षाची धोरणे सभागृहात मांडण्यासह आवश्यकतेनुसार सभागृहात कोणती भूमिका घ्यावयाची या संदर्भातही सदस्यांना मार्गदर्शन करण्याची भूमिका चोपडे यांना पार पाडावी लागणार आहे. सभागृहाचा अनुभव आणि अभ्यासू नेतृत्व यामुळे विठ्ठल चोपडे हे आपली भूमिका समर्थपणे पार पाडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *