यड्रावात आढळला दुर्मीळ ‘डेथ्स-हेड हॉकमॉथ’ पतंग

शिरोळ तालुक्यातील यड्राव येथील रामचंद्र साने यांच्या परस बागेतील प्राजक्ताच्या झाडावर फुलपाखरासारखा दिसणारा हा प्रत्यक्षात एक दुर्मिळ पतंग आढळला आहे. हा पतंग झाडावर दिसल्यानंतर संस्कार साने यांनी त्याचे छायाचित्र मोबाईल मध्ये काढले.तसेच अदिती साने,सिद्धी सानेंच्या सहकार्याने याबाबतची माहिती गुगलवरुन घेतली.पतंगाच्या पंखांच्या वरच्या भागावर दिसणारी आकृती ही मानवी कवटी किंवा भुताचा चेहरा वाटते. यामुळे याला इंग्रजीत Death’s-head Hawk Moth असे नाव मिळाले आहे.याचे वैशिष्ट्य म्हणजे हे मोठे, निशाचर पतंग आहेत. ज्यांचे पंख १३ सेमी पर्यंत पसरलेले असतात. त्यांचे सामान्यतः पुढचे पंख गडद तपकिरी आणि फिकट तपकिरी असतात. आणि मागचे पंख पिवळे किंवा नारिंगी असतात. ज्यावर गडद खुणा असतात. प्रौढ पतंग मध खाण्यासाठी मधमाश्यांच्या पोळ्यांवर हल्ला करतात म्हणून त्यांना “मधमाशी दरोडेखोर” असे टोपणनाव मिळाले आहे.याचे सांस्कृतिक महत्त्व म्हणजे याचा रहिवास युरोप, आफ्रिका आणि आशियाच्या काही भागात आढळतो. महत्त्वाचे म्हणजे हा पतंग हलका कर्कश आवाज करू शकतो, जो इतर पतंगांपेक्षा वेगळा आहे. द डेथ्स-हेड हॉकमॉथ हा द सायलेन्स ऑफ द लॅम्ब्ससह लोकप्रिय काल्पनिक कथा आणि माध्यमांमध्ये आढळतो. आणि त्याचे नाव पौराणिक उत्पत्तीचे आहे. जे ग्रीक मोइराई (भाग्य) आणि अंडरवर्ल्ड नद्यांच्या अचेरॉन आणि स्टायक्सशी संबंधित आहे.त्याच्या अनोख्या आकृतीमुळे शतकानुशतके लोकांच्या कुतूहलाचा विषय ठरला आहे. निसर्गाने दिलेलं हे रूप पाहून कुणालाही आश्चर्य आणि कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गप्रेमींना हा एक विलक्षण अनुभव या निमित्ताने पाहायला मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *