सांडपाणी गटारी साठी स्वामी मळा परिसरात नागरिक बसणार उपोषणाला

इचलकरंजी महापालीका हद्दीमध्ये स्वामी मळा या परिसरातील फरशी कारखाना गल्ली, याठिकाणी अनेक वर्षापासून वास्तव्यास आहोत. गल्लीमध्ये पूर्वीपासुन सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारीची व्यवस्था होती. परंतु काहि महिन्यांपूर्वी अॅड. मुजावर यांनी सदरची गटार ही माझ्या स्वःताच्या मिळकतीतून जात असल्याचे कारण सांगुन त्याठिकाणा पासुन गटार बंद केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे सांडपाणी सारण गटारीस जाऊन न मिळता एकाच ठिकाणी साचत आहे.

            सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसाचे पाणी व अॅड. मुजावर यांनी मुजवुन घेतलेली गटारीचे पाणी त्या ठिकाणी रिकाम्या जागेत साचल्याने तिथे सांडपाण्याचे तळे साचले आहे. सांडपाणी सारण गटारीस न जाता तेथेच साचुन राहिल्याने नागरिकांची गैरसोय झाली असुन परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. सांडपाणी साठलेने डासांची पैदास होऊन ताप, डेंगू, असे आजार नागरीकांना व लहान मुलांना होत असुन परिसरात रोगराई पसरली आहे. तरी तिथे सांडपाणी गटारी ची व्यवस्था करण्यात यावी असे निवेदना व्दारे भारतीय जनता पार्टी अध्यक्ष शशिकांत मोहिते यांच्या सह भागातील नागरिकांनी शिष्टमंडळाने मा.उपाआयुक्त अशोक कुंभार यांच्या कडे मागणी केली आहे.

            महानगरपालिकेकडुन तेथील परास्थिती हि गंभीर स्वरुपाची असुन तात्काळ दखल घेऊन गल्लीतील सांडपाण साठु नये यासाठी उपाययोजना करुन नागरीकांची होणारी गैरसोय, दूर करण्यासाठी नियोजन करून गटारीची व्यवस्था करण्यात यावी. तसे न केल्यास सोमवार दिनांक 4 ऑगस्ट 2025 पासून महापालिकेच्या समोर आम्ही परीसरातील नागरिक उपोषणाला बसुन आंदोलन करणार असल्याचे इशारा दिला .निवेदन देते वेळी शशिकांत मोहिते अध्यक्ष भाजपा, राकेश मोरे रामचंद्र जाधव आनंद मोरे, अनिल मोरे,सौ.मोरे वहिनी सौ.पाटील, सर्जेराव परीट, सुनिल परीट, दत्ता परीट, अभिजित मगदूम यांच्या सह परीसरातील नागरिक उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *