
डीकेटीईच्या ९ विद्यार्थ्यांची कॉग्निझंट या नामांकित कंपनीत कॅम्पसद्वारे प्लेसमेंट झाली आहे. कॉग्निझंट ही आंतरराष्ट्रीय पातळीवर माहिती तंत्रज्ञान सेवा देणारी नामांकित कंपनी आहे. १९९४ मध्ये स्थापन झालेली ही कंपनी सॉफटवेअर डेव्हलपमेंट, डिजीटल सोल्यएशन्स, आयटी कन्सलंटिंग आणि बिझनेस आउटसोसिर्ंग (बीपीओ)अशा विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. कॉग्निझंटकडून अनेक भारतीयांना रोजगार संधी उपलब्ध झालेल्या आहेत.
अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अदययावत तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी डीकेटीई संस्था सातत्याने नवनविन उपक्रम राबवत असते. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच शिक्षण घेतानांच विविध नामांकित कंपन्यात प्रशिक्षणासाठी पाठविण्यामध्ये डीकेटीई ही संस्था नेहमीच आघडीवर आहे. आज डीकेटीई ही संस्था केवळ शिक्षणसंस्था नसून, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी दिशा दाखवणारे आणि संधी निर्माण करणारे एक प्रभावी व्यासपीठ ठरली आहे त्यामुळेच डीकेटीईच्या विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट नामांकित कंपन्यामध्ये होत आहेत.
या कॅम्पस इंटरव्हयू मधून डीकेटीईच्या कॉम्प्युटर विभागातून अदित्य पाटील, श्रीहरी जाहगिरदार, प्रथम मुनोत, अर्या हजारे, प्रियंका माळी, अर्टिफिशिएल इंटेलिजन्स विभागातून ॠुतुजा कुराडे, अंकांक्षा येडरावे, पियुषा शिंदे व इएनटीसी इंजिनिअरींग विभागातून निधी कडाने एकूण ९ विद्यार्थ्याना कॉग्निझंट या इंडस्ट्रीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी मिळाली.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ. सपना आवाडे,कार्यकारी संचालक रवी आवाडे सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांना संस्थेच्या डायरेक्टर प्रा.डॉ.सौ.एल.एस.अडमुठे, डे.डायरेक्टर डॉ. यु.जे.पाटील, विभागप्रमुख डॉ डी.व्ही. कोदवडे, डॉ. एस. के. शिरगांवे, डॉ. एस.ए.पाटील, टीपीओ प्रा.जी.एस. जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.