शतक ठोकताच स्टँडमध्ये आले, कोलांटी उडी मारण्याची विनंतीही केली

इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने (Ind vs Eng Test Match) इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. पहिल्या डावात 6 धावांची आघाडी मिळाल्याने टीम इंडियाने दुसऱ्या डावात 364 धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडला आता पहिला कसोटी सामना जिंकण्यासाठी 371 धावा कराव्या लागतील. चौथ्या दिवशी भारताकडून केएल राहुल (KL Rahul) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांनी शतके झळकावली. परंतु खालच्या क्रमवारीमधील भारतीय खेळाडूंनी पुन्हा खराब कामगिरी केली. 

अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताच्या उपकर्णधार ऋषभ पंतने इतिहास रचला. इंग्लंडमध्ये कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरण्याचा मान पटकावला. 93 वर्षांच्या भारतीय कसोटी क्रिकेट इतिहासात हे अभूतपूर्व यश आहे. पण, शतक केल्यानंतर पंत जास्त काळ क्रीजवर राहू शकला नाही आणि 140 चेंडूत 118 धावा करून बाद झाला. त्याच्या खेळीत 15 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता.

ऋषभ पंतने पहिल्या डावात शतक झळकावल्यानंतर कोलांटी उडी मारुन सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यामुळे ऋषभ पंतने दुसऱ्या डावात शतक झळकावल्यानंतर सर्वांना कोलांटी उडी पाहण्याची उत्सुकता होती. मात्र, ऋषभ पंतने यावेळी असे काही न करता साधेपणाने शतकाचा जल्लोष केला. यावेळी स्टँडमध्ये असलेले दिग्गज सुनील गावसकर यांनीही त्याला इशारा करून कोलांटउडी मारण्यास सांगितले. याकडे ऋषभ पंतनेही, ‘पुढच्या वेळी मारेन’, असे इशाऱ्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *