गेली कित्येक वर्ष मराठी सिनेसृष्टी (Marathi Film Industry) गाजवणारा कल्ट सिनेमा म्हणजे, ‘अशी ही बनवा बनवी’ (Ashi Hi Banwa Banwi Movie). सिनेमा रिलीज होऊन एवढी वर्ष उलटली तरीसुद्धा या सिनेमाची क्रेझ अद्याप कमी झालेली नाही. या सिनेमात लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde), अशोक सराफ (Ashok Saraf) आणि सचिन पिळगांवकरांच्या (Actor Sachin Pilgaonkar) त्रिकुटानं धम्माल उडवली होती. आजही हा सिनेमा टिव्हीवर लागला तरीसुद्धा सगळे हातातली कामं बाजूला सारून धम्माल विनोदाची मेजवाणी अनुभवायला टीव्हीसमोर येऊन बसतात. अशातच सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकलेले मराठी सिनेसृष्टीचे महागुरू सचिन पिळगांवकरांनी एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा खुलासा केला आहे.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना सचिन पिळगांवकरांनी सिनेमातील महत्त्वाच्या भूमिकेसोबतच सिनेमात आणखी एक महत्त्वाची भूमिका बजावल्याचं सांगितलं. सिनेमातील डायलॉग्स मी लिहिलेले असं सचिन पिळगांवकरांनी सांगितलं. ते म्हणाले की, ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमातले मोजून तीन डायलॉग सेटवर बोलले गेले असतील. बाकी सगळे डायलॉग स्क्रीप्टमध्ये लिहिले होते. वसंत सबनीस आणि मी एकत्र बसून ती स्क्रीप्ट लिहिली होती.