भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टेस्ट सामना रोमांचक स्थितीत पोहोचला आहे. कारण इंग्लंडला आता शेवटच्या पाचव्या दिवशी 371 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे. त्यामुळे इंग्लंड हे लक्ष्य गाठण्यास यशस्वी ठरतो की टीम इंडिया ऑल आऊट करण्यास यशस्वी ठरते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान आता या टेस्ट दरम्यानच टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. कारण इंग्लंडच्या संघात एका स्टार खेळाडूची एंन्ट्री झाली आहे.
इंग्लंडचा 30 वर्षीय अनुभवी वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर दुसऱ्या कसोटीसाठी संघात परतण्याची शक्यता आहे. कारण दुखापतग्रस्त असलेला जोफ्रा आर्चर डरहम येथे ससेक्ससाठी काउंटी चॅम्पियनशिप सामना खेळणार आहे.जर हा सामना खेळला तर त्याला 2 जुलैपासून भारताविरुद्ध सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान जोफ्रा आर्चरची जर संघात एंन्ट्री झाली तर इंग्लंडची गोलंदाजीची ताकद मजबूत होणार आहे.
भारताविरुद्ध अँडरसन तेंडुलकर मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात आर्चर आणि मार्क वूडशिवाय इंग्लंडचा गोलंदाजी हल्ला कमकुवत दिसत होता.स्काय स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, “जोफ्रा आर्चर ससेक्ससाठी रेड बॉल क्रिकेटमध्ये परतेल, जरी त्याला या काउंटी चॅम्पियनशिप सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले नाही. जर तो सामना खेळू शकला तर तो एजबॅस्टन येथे भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात असू शकतो.त्यामुळे इंग्लंडच्या गोलंदाजाची ताकद वाढेल आणि संघाला मोठा दिलासा मिळेल.