दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका तरुणाने आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी बुरखा घालून तिच्या घराच्या छतावर पोहोचला. आपल्या प्रियकराला पाहून प्रेयसीही त्याला भेटण्यासाठी छतावर आली. पण प्रियकर येताच त्याने असे काही केले की तुम्हालाही धक्का बसेल. नेमके काय घडले, ते जाणून घेऊया…
गर्लफ्रेंडला पाचव्या मजल्यावरून फेकले
खरं तर, ही घटना दिल्लीतील अशोक नगर परिसरातील आहे. येथे सोमवारी सकाळी तौफिक नावाचा एक मुस्लिम तरुण बुरखा घालून त्याची प्रेयसी नेहाच्या घराच्या छतावर पोहोचला. त्याची प्रेयसी त्याला भेटण्यासाठी आली असता, तौफिकने नेहाला पाचव्या मजल्यावरून थेट खाली रस्त्यावर फेकून दिले. खाली पडल्याने नेहा गंभीर जखमी झाली. त्यानंतर आरोपी तौफिक पुन्हा बुरखा घालून पळून गेला. दरम्यान, 19 वर्षीय नेहाला जीबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान तिचा रात्री मृत्यू झाला