
जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका आयोजित शालेय शासकीय 14, 17, 19 वर्षाखालील व्हॉलीबॉल स्पर्धा शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे पार पडल्या .
या स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या मुलींनी सलग दुसऱ्या वर्षी आपापल्या गटामध्ये अजिंक्यपद राखत प्रथम क्रमांक मिळवला व अशीच यशाची पताका कायम ठेवली. या मुलींची सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली.
या तिन्ही विजयी संघांना श्री ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट मा. श्रीनिवासजी बोहरा, चेअरमन श्री कृष्णाजी बोहरा,व्हाईस चेअरमन श्री उदयजी लोखंडे, ट्रेझरर श्री महेशजी बांदवलकर, मानद सचिव श्री बाबासाहेब वडिंगेसो, स्कूल कमिटी चेअरमन मारुतराव निमकनर, तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व विश्वस्त यांचे मौलिक सहकार्य लाभले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ ए एस काजी, पर्यवेक्षिका व्ही एस लोटके, पर्यवेक्षक एस एस कोळी, उपप्राचार्य व्ही जी पंतोजी यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.
क्रीडा संघटक प्रा. शेखर शहा सर, क्रीडा अधिकारी संजय शेटे, उप क्रिडाधिकारी संजय कांबळे , सचिन खोंद्रे, आकाश माने व सर्व क्रीडा शिक्षक, पंच उपस्थित होते.
या खेळाडूंना प्राध्यापक शेखर शहा, जिमखाना प्रमुख श्री बी एस माने, क्रीडा शिक्षक के ए पाटील व डी डी कोळी व सलीम मुजावर यांचे मार्गदर्शन लाभले.