
इचलकरंजीः सुरज बबन कांबळे राः रेणुका नगर झोपडपट्टी, इचलकरंजी यास पूर्वीच्या वादातून डोक्यात दगड घालून खून केलेच्या आरोपातील संशयित महादेव नामदेव पोवार राः हनुमान नगर, इचलकरंजी याची इचलकरंजी येतील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. मिलिंद भोसले यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. संशयित तर्फे अॅड मेहबूब बाणदार यांनी काम पहिले.
मयत सुरज कांबळे हा संशयित महादेव पोवार याचे कडे वहीफनी कामगार म्हणून काम करत होता पूर्वी झालेल्या वादातून दि ०३/१०/२०२२ रोजी महादेव याने सुरज ला बोलावून घेऊन दुपारी ३ च्या पूर्वी त्याचा शहापूर येथील लोटस पार्क समोरील मैदानात दगडाने खून केला होता. सुरवातीस अज्ञात व्यक्ती विरोधात फिर्याद शहापूर पोलीस स्टेशन येथे नोंद झाली सदरची फिर्याद ही मयताचा मामा अशोक लोकरे यांनी दिली होती. त्या नंतर पोलिसांनी तपास सुरु करून संशयित महादेव यास अटक केली. त्यानंतर सदरचा तपास हा डी.वाय.एस.पी. महामुनी यांचे कडे वर्ग झाला. त्यांनी तपासाअंती संशयित विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले
सदर प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायालयात सुरू झाली. सुनावणीत सरकार पक्ष तर्फे फिर्यादी, घरचे लोक, वैद्यकीय अधिकारी डॉ. कुमार कदम, शहापूर चे तलाठी गणेश सोनावणे, तपासी अधिकारी महामुनी यांच्या महत्व पूर्ण साक्षी नोंदवण्यात आल्या. संशयितांनी गुन्ह्य बद्दल इतर इसमा समोर दिलेली कबुली हा कमकुवत पुरावा आहे. घटनास्थळ च्या पंचनामा मध्ये दगड सापडला नाही मात्र तोच दगड आरोपी घटनास्थळ वरून काढून देतो. हे संशयास्पद आहे. हेतू साध्य झाला नाही, शेवटचे एकत्र पहिलेच पुरावा सिद्ध होऊ शकला नाही हा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील आड मेहबूब बाणदार यांनी मांडला. कोर्टासमोरील पुरावा व युक्तिवाद याचे अवलोकन करून मा. न्यायालयाने संशयित महादेव पोवार याची निर्दोष मुक्ततः केली. रादर
कमी अॅड बाणदार यांना अॅड बोहरा, अॅड हणबर, अॅड पी. कुलकर्णी, अॅड शीरढोणे, अॅड पाटील, अॅड दानवाडे, अॅड जाधव, अॅड देसाई व नंदू नेर्लेकर यांनी सहाय केले