अतिक्रमण काढण्यासाठी महानगरपालिका ॲक्शन मोडवर

इचलकरंजी शहर हे अतिक्रमणाच्या विळ्याख्यात सापडले आहे महानगरपालिका एक दिवस अतिक्रमण  काढते पुन्हा येरे माझ्या मागल्या   पुन्हा दुसऱ्या दिवशी हेच अतिक्रमण   फेरीवाले पुन्हा अतिक्रमण करतात दुकान  गाळा असून सुद्धा रस्त्यावर पुन्हा स्टॉल मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करतात यामुळे रस्त्यावरून येणाऱ जाणाऱ्या नागरिकांना त्रास होतो तसेच फुटपाथोरी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहेत आज उपायुक्त कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील महापुरुषांच्या पुतळ्या जवळील शंभर मीटर परिसरातील सर्व अतिक्रमण काढून घेण्यात आले  तसेच मुख्य मार्गावरील  ही अतिक्रमण  काढण्यात आले  ही मोहीम कायमस्वरूपी सुरू व्हावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे शिवतीर्थ परिसरात असणाऱ्या बस स्थानकासमोरील गजरे विक्रेते  हेही अतिक्रमण मोठ्या प्रमाणात करत असतात त्यामुळे वाहन  धारकांना याचा मोठा  त्रास होतो त्यांचे अतिक्रमण काढून घेण्यात आले आहेत जर पुन्हा असे कोण अतिक्रमण  करतील  त्याच्यावर कडक कारवाईचा   इशारा आयुक्त पल्लवी पाटील यांनी फेरीवाले व अतिक्रमण धारकांना दिला आहे महानगरपालिकेने फक्त   गोरगरीब जनतेच्या अतिक्रमण न काढता शहरातील धनदांडग्यांचे  सुद्धा रस्त्यावर बेकायदेशीरपणे बांधकाम जनरेटर ठेवले आहेत त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी सध्या सर्वसामान्य जनतेतून होऊ लागले आहे इचलकरंजी शहर अतिक्रम  मुक्त व्हावे यासाठीच सर्वांनीच महापालिकेला सहकार्य करावे तसेच आपले शहर स्वच्छ सुंदर राहिले तर शहराचे नाव राज्यात देशात उंचावेल त्यामुळे प्रत्येक फेरीवाले अतिक्रमण धारक  यांनी महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे  आपला उद्योग व्यवसाय करावा असे आवाहनही महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे यावेळी श्रावणामध्ये मोठ्या प्रमाणात सण असतात त्यामुळे रस्त्यावर भव्य दिव्य मंडप घालून काही व्यापारी व्यापार करत असतात पण रस्त्याला मोठी अडचण होत असते त्यांना सुद्धा परवानगी देताना रस्त्यावर मंडप घालू नये व वाहतुकीस अडथला निर्माण होणार नाही याची खात्री करून परवानगी द्यावी  जर त्यांनी अतिक्रमण केले त्यांचे अतिक्रमण काढावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे हे अतिक्रमण काढण्यासाठी उपायुक्त कदम   तसेच अतिक्रमण प्रमुख सुभाष आवळे व महानगरपालिकेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *