संजय घोडावत खंडणी प्रकरणी मणेरे व ओझा यांना आरोपी करणे बाबत आदेश पारित-एडवोकेट अल्ताफहुसेन मुजावर

हातकणंगले तालुक्यातील उद्योगपती संजय दानचंद घोडावत यांचे कडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितले बाबत त्यांनी हातकणंगले पोलीस ठाणे यांच्याकडे गुन्हा रजिस्टर नंबर 334/ 2021 अन्वये फिर्याद दिलेले होती सदर कमी सहा आरोपींना अटक करण्यात आले होते व त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले होते. सदर कामी पोलिसांनी केलेला तपास हा मान्य नसल्याने संजय घोडावत यांनी इचलकरंजी येथील न्यायालयामध्ये सदर कामी फेर तपास व्हावा व सखोल चौकशी होऊन *शितल सुधाकर मणेरे* रा- इचलकरंजी व *महेश कुमार ओझा* रा-मुंबई यांना देखील आरोपी करणे करीता अर्ज दाखल केलेला होता. सदरचा अर्ज माननीय न्यायाधीश श्री. ए. आर. कुलकर्णी यांनी मंजूर केलेला आहे. सदर कामी फिर्यादी संजय घोडावत यांचे वतीने *एडवोकेट अल्ताफहुसेन मुजावर* हे काम पाहत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *