‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोची प्रेक्षकांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून क्रेझ आहे. हा टीव्हीवरील सर्वाधिक TRP शोपैकी एक आहे. आतापर्यंत ‘बिग बॉस’चे 18 सीझन आले आहेत. तर बिग बॉस OTT चे तीन सीझन डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम केले गेले आहेत. प्रेक्षक आधी ‘बिग बॉस OTT’ च्या चौथ्या सीझनची वाट पाहत होते. बिग बॉस ओटीटी यावेळी न येता थेट बिग बॉस 19 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘बिग बॉस 19’ यावेळी ऑक्टोबर येणार असल्याच्या चर्चा होत्या. इतकंच नाही तर 19 जुलैपासून सुरू होईल असंही म्हटलं जात होतं. पण याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. लेटेस्ट अपडेटनुसार, ‘बिग बॉस 19’ 3 ऑगस्टपासून सुरू होऊ शकतो. बिग बॉस 19 च्या प्रीमियरची अधिकृत तारिख देखील अद्याप समोर आलेली नाही.