श्रीदेवीने नाकारलेला चित्रपटामुळे या अभिनेत्रीचे उजळले नशीब

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना हा चित्रपट का नाकारला याचा आजही पश्चात्ताप होतो. जेव्हा हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला त्यानंतर त्यांना खूपच दुःख झाले. असाच एक चित्रपट होता जो बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांनी नाकारला होता. त्यानंतर या चित्रपटाची ऑफर बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितला देण्यात आली होती. तिने या चित्रपटाची कथा ऐकताच लगेच होकार दिला. हा चित्रपट 90 च्या दशकात प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटात अनिल कपूर मुख्य भूमिकेत होते. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट प्रदर्शित होताच हिट झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. कोणता आहे हा चित्रपट ज्याला श्रीदेवी यांनी दिला होता नकार?

श्रीदेवी यांनी नकार दिलेला या चित्रपटाची निर्मिती बोनी कपूर यांनी केली. त्यांना या चित्रपटात त्यांची पत्नी श्रीदेवीला कास्ट करायचे होते. मात्र, अभिनेत्रीने नकार दिला. 1990 मध्ये श्रीदेवीने चिरंजीवीसोबत ‘जगदेका वीरूदु अतिलोका सुंदरी’ नावाने हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटाचे इंदर कुमारने तमिळ हक्क घेतले होते.  या चित्रपटात अनिल कपूरच्या विरुद्ध माधुरी दीक्षितला कास्ट करण्यात आले होते. 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे नाव ‘बेटा’ होते. या चित्रपटात माधुरी दीक्षितने अनिल कपूर यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. तर या चित्रपटात अभिनेत्याच्या आईची भूमिका अरुणा इराणीने साकारली होती. 

ही भूमिका सर्वात प्रथम वहीदा रहमान, माला सिन्हा आणि शर्मिला टागोर यांना मिळाली होती. परंतु, या सर्व अभिनेत्रींनी ही नकारात्मक भूमिका करण्यास नकार दिला होता. त्यानंतर ही भूमिका इंद्राने ही भूमिका त्याची अरुणा हिला दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *