सदाबहार तरुण दिसण्यासाठी फक्त एक चमचा तूप गरजेचे आहे, वाचा तूप लावण्याचे फायदेआपल्या प्रत्येकाची इच्छा असते की, आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य टिकून राहावे. परंतु वयोमानापरत्वे आपल्या चेहरा कोरडा पडणे, सुरकुत्या येणे हे खूप सर्वसामान्य आहे. रासायनिक उत्पादनांपेक्षा केव्हाही घरगुती उपाय कायम फायदेशीर ठरतात. म्हणूनच चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी तूप हे फार महत्त्वाचे मानले जाते. देशी तूप हे आपल्या प्रत्येकाच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते.
स्त्री असो किंवा पुरुष सौंदर्यासाठी तूपाची महती ही अवर्णनीय आहे. सौंदर्य टिकवण्यासाठी तूपाचा वापर हा फार पूर्वीपासून केला जात आहे. तूप हे आपल्या त्वचेसाठी फार गरजेचे आहे. तूप हे आपल्या चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक तर येतेच, शिवाय आपली त्वचा तरुण दिसू लागते.
चेहऱ्यावर तूप लावण्याचे फायदे
देशी तूप आपल्या त्वचेसाठी फार गरजेचे मानले जाते. रात्री झोपण्यापूर्वी देसी तूप चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या कमी होतातच, शिवाय त्वचेला नैसर्गिक चमक येते.
आपल्या डोळ्याभोवती असलेली काळी वर्तुळे तूप लावल्याने खूप मोठ्या प्रमाणात कमी व्हायला मदत होते.
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी तूप खूप महत्त्वाची भूमिका निभावते.
रात्री तूप लावण्याची योग्य पद्धत
रात्री तूप लावण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. चेहरा सुकला की, एक चमचा शुद्ध देशी तूप घ्या आणि बोटांनी हलक्या हातांनी चेहऱ्यावर मालिश करा. अशा प्रकारे मालिश करा की तूप त्वचेत पूर्णपणे शोषले जाईल. आपण चेहऱ्याला लावलेले तूप रात्रभरही तसेच ठेवू शकतो. सकाळी चेहरा स्वच्छ धुवावा, असे आठवड्यातून किमान ३-४ वेळा करणे हे खूप गरजेचे आहे. यामुळे त्वचा तरुण तेजस्वी दिसण्यास मदत होईल.
चेहऱ्याला तूप कोणी लावू नये?
देशी तूप सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे, परंतु ज्यांची त्वचा खूप तेलकट आहे किंवा ज्यांना मुरुमांची समस्या आहे, त्यांनी तूप लावू नये. तूप लावल्यामुळे तेलकट चेहऱ्यावर मुरुमांची समस्या अधिक वाढण्याची धोका असतो.