
प्रकल्प ठरणार इचलकरंजी साठी निर्णायक

इचलकरंजी महापालिकेत MRTC (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) च्या वतीने एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्य सरकार कडून राबविण्यात येणाऱ्या पूर नियंत्रण व दुष्काळ व्यवस्थापन प्रकल्पांच्या(project) अनुषंगाने ही बैठक इचलकरंजी साठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील दरवर्षीच्या पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी MRTC ने विशेष उपाययोजना आखल्या आहेत. जागतिक बँकेच्या आर्थिक मदतीने या भागांमध्ये प्रभावी पूर नियंत्रणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचे नियोजन सुरू आहे. यामध्ये नद्या आणि नाले व्यवस्थापन, जलसाठ्याची शास्त्रशुद्ध पुनर्रचना, आणि जलप्रवाह नियंत्रण यांसारख्या आधुनिक उपाययोजना समाविष्ट आहेत.
या प्रकल्पाचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणजे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागांसाठी कोल्हापूर-सांगली येथील अतिरिक्त पावसाचे पाणी वळवण्याची योजना. यामुळे मराठवाड्यातील पाण्याची टंचाई कमी होईल आणि शेती व पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण होतील. या प्रकल्पा(project)अंतर्गत पूर नियंत्रणासोबतच दुष्काळ व्यवस्थापन, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा, आणि स्थानिक पातळीवर क्षमता विकासा वरही भर देण्यात येणार आहे. स्थानिक यंत्रणांना पूरचा सामना करण्यासाठी प्रशिक्षण, आधुनिक साधने, व तांत्रिक सहाय्य पुरवले जाणार आहे.
या बैठकीत आमदार डॉ राहुल आवाडे या या प्रकल्पाविषयी महत्त्वाची माहिती देत
या प्रकल्पात कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर नियंत्रणासाठी 800 कोटी रुपयांच्या आराखड्याचा समावेश आहे. यासह जिल्ह्यातील पूर नियंत्रणाची अन्य कामे, भूस्खलन, भूकंप, वीज पडणे निराकरण उपाययोजना, ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसास्थळे संरक्षित करणे, पुराची पूर्वकल्पना देणे, आपत्ती व्यवस्थापन उपकरणे आदींचाही या प्रकल्पात समावेश असून त्यालाही निधी मिळणार असलेच सांगितले
2005, 2019 आणि 2021 या इचलकरंजी परिसराला वर्षांत महापुराचा मोठा फटका बसला. महापूर आलेल्या प्रत्येकवर्षी त्याची पातळी वाढतच गेली. त्यामुळे इचलकरंजी चे अतोनात नुकसान झाले. व्यापारी, उद्योजक, लहान-मोठे व्यावसायिक आदींसह नागरिकांची प्रचंड आर्थिक हानी झाली. महापुराचा इचलकरंजी शहरासह चंदुर व शिरोळ या तालुक्यांतील अनेक गावांना विळखा पडतो.या पार्श्व भूमीवर प्रकल्प इचलकरंजी साठी किती महत्त्वाचा आहे हे नमुद करताना या बरोबरच चंदुर ते तेरवाड बंधारा नदीची खोली वाढविण्यासाठी गाळ माती काढण्यासाठी आवश्यकता परवानग्या घेऊन अंमलबजावणी करण्यासाठी सुचनाही दिल्या यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील अति आयुक्त सुश्मा शिंदे कोल्हे यांच्या सह पाटबंधारे विभागाचे अभियंता,MRTC चे अधिकारी आणि जागतिक बँकेचे प्रतिनिधी व प्रकल्पाचे कन्सल्टंन मैत्रा चे अधिकारी महानगरपालिका अधिकारी यांनी प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भात सविस्तर चर्चा केली.तसेच नदीनदीकाठच्या पूरग्रस्त नागरिकांन सह माजी नगरसेवक,राजकिय पक्षांच्या प्रतिनिधी ,सामाजिक संस्था सामाजिक कार्यकर्ते यांच्या प्रकल्पाच्या विषयी सुचना, हरकती शंकेचे निरासन केले इचलकरंजी शहर तसेच प्रकल्पाच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील भागांतील नागरिकांना एकत्रित दिलासा मिळेल,असा विश्वास उपस्थितासह प्रशासनाने व्यक्त केला .