तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी ओळखाल?

आपल्या प्रत्येकाच्या शरीरासाठी व्हिटॅमिन डी हे अत्यावश्यक आहे. व्हिटॅमिन डी हे चरबीत विरघळणारे जीवनसत्व आहे, त्यामुळे आरोग्यासाठी आवश्यक मानले जाते. व्हिटॅमिन डीमुळे आपली हाडे मजबूत राहतात. तसेच आपले मानसिक आरोग्यही सुधारते. आपल्यामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास, काही महत्त्वाचे बदल हे आपल्या त्वचेवर आणि पायांवर दिसू लागतात.

व्हिटॅमिन डी मिळवण्याचा सर्वात सहजसुलभ मार्ग म्हणजे सूर्यप्रकाश. व्हिटॅमिन डी हाडांच्या आरोग्यापासून ते रोगप्रतिकारक शक्तीपर्यंत आपल्या प्रत्येकासाठी खूपच गरजेचे आहे.

व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी ओळखावी?

व्हिटॅमिन डीची कमतरता असलेल्या व्यक्तीला जखमा बऱ्या होण्यास नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो. त्वचेवर सतत खाज सुटणे, हेही व्हिटॅमिन डी कमी असण्याचे मुख्य लक्षण आहे.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक म्हणजे जास्त घाम येणे. जास्त घाम येणे, विशेषतः चेहऱ्यावर, हे एक प्रारंभिक लक्षण आहे.

व्हिटॅमिन डी आपण कशामधुन मिळवु शकतो?

सोया मिल्क मध्येही व्हिटॅमिन डीची मात्रा अधिक आहे. सोया मिल्क कोणत्याही जनरल स्टोर्समध्ये सहज उपलब्ध असते. सकाळी साधारण अर्धा ग्लास सोया मिल्क पिण्यामुळे आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी मिळु शकते. सोयामिल्कमध्ये आयर्न प्रोटीन याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरासाठी हे दोन्ही घटक खूपच उपयुक्त आहेत.

मासे हे व्हिटॅमिन डीचा चांगला स्त्रोत मानले जातात. त्यामुळेच आहारात मासे समाविष्ट करणे हे खूप गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *