इचलकरंजी शहरातील गडहिंग्लज विभाग अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांची बदली अमली पदार्थ टास्क फोर्स पोलीस अधीक्षक पदी झाली आहे तर गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे राज्यातील अधीक्षक उपाधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत रत्नागिरीच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदी बीबी महामुनी यांची नियुक्ती करण्यात आली तर जयश्री गायकवाड यांची अहिल्या नगर गुप्त वार्ताहर सीआयडी खात्यात बदली करण्यात आली आहे गेल्या दोन वर्षापासून निकेश खाटमोडे पाटील यांनी आरोपींवर चांगलीच वचक ठेवण्यात यशस्वी झाले होते अतिशय शांत स्वभाव पद्धतीने काम करणारे निकेश खाटमोडे-पाटील यांनी गडिंग्लज विभाग अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला आहे त्यांच्यावर जिल्ह्याचा पदभार ही स्वीकारला होता त्यावेळी त्यांनी सुद्धा जिल्हा मध्ये चांगले पोलिसिंग दाखवले होते इचलकरंजी शहरातील आरोपींवर वचक ठेवण्यासाठी तसेच आरोपींना आरोपी सारखे ठेवायचे जनतेशी नाळ जोडलेले म्हणून निकेश खाटमोडे पाटील यांची इचलकरंजी शहरांमध्ये एक ओळख निर्माण झाली होती अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव लवकरच गडहिंग्लज विभागाचा पदभार घेणार आहेत
अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांची बदली त्यांच्या जागी आण्णासाहेब जाधव यांची नियुक्ती
