
इचलकरंजी महानगरपालिकेकडील गेल्या सहा महिन्यात बरेचशे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहे. त्यांचे निवृत्ती पश्चातील लाभ (प्राव्हीडंट फंड, मुज्यूअटी, शिल्लक हक्काच्या रजेचा पगार, इ.) त्यांना अद्याप मिळालेले नाहीत. सदरची प्रकरणे लेखापरिक्षण विभागामध्ये प्रलंबित असलेचे समजते.
सदरची रक्कमच निवृत्ती पश्चात कर्मचा-याचे उदरनिर्वाहाचे साधन असते. कर्मचा-यांच्या कर्जावारील व्याजाची रक्कम वाढत आहे. तसेच त्या पैशामधूनच कर्मचारी आपले औषध उपचार करतो. मिळाले नाही, तर त्याची आर्थिक परिस्थिती ढासाळू शकते. मे. शासन निर्णय / परिपत्रकानुसार सेवानिवृत्त कर्मचा-यांचे निवृत्ती पश्चात मिळाणारे लाभ देणेस विलंब झालेस ती रक्कम व्याजासह मिळणेची तरतुद आहे. तरी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचा-यांचे सर्व लाभ लवकरात लवकर विनाविलंब तात्काळ त्यांना मिळावेत अन्यथा व्याजासहित रक्कम द्यावी लागेल. याकामी आपण संबंधितांना आदेश करावेत. ही विनंती चे निवेदना व्दारे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या कडे केली आहे