आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी गेलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेतील
कर्मचारी राजेंद्र सनगर हे आंबोली येथील कावळेसाद दरीत कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली होती.
त्यानंतर पोलीस आणि आंबोली रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आल होत. शुक्रवार सायंकाळपासून तीनशे फूट खोल दरीत शोध मोहीम सुरू होती.
रात्रीचा काळोख आणि दाट धुक्यामुळ, या शोध मोहीम मध्ये मोठ्या अडचणी येत होत्या. त्यामुळ शुक्रवारी रात्री कावळेसाद दरीतील शोध मोहीम थांबवण्यात आली होती.
आज शनिवारी पुन्हा सकाळपासून शोध मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती. मात्र या ठिकाणचे दाट धुके आणि पाऊस, त्यामुळ शोध मोहिमेसाठी मोठ्या अडचणी येत होत्या. अखेर, दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास राजेंद्र सनगर यांचा मृतदेह आढळून आला.राजेंद्र सनगर हे दरीत कोसळल्याने, ते जिवंत असण्याची आशा, त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांना लागून होती. मात्र कदाचित नियतीला ते मान्य नव्हते. राजेंद्र सनगर यांचा मृतदेह आढळून आल्याने, अखेर, शुक्रवारपासून सुरू असलेली शोध मोहीम थांबली आहे. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर कोल्हापूरकडे आणला जाणार आहे.राजेंद्र सनगर हे त्यांच्या १४ सहकाऱ्या सोबत आंबोली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी शुक्रवारी गेले होते. कावळेसाद पॉईंट येथे रेलिंगजवळ उभे असताना त्यांचा पाय अचानक घसरला आणि ते दरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली होती.
