व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

व्हॉईस ऑफ मीडियाच्या कोल्हापूर जिल्हा व इचलकरंजी शहरतर्फे राज्यस्तरावर एकूण आठ पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्याच्या या महत्वपूर्ण निवडीसाठी ही बैठक पार पडली. सदरची बैठक संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

या बैठकीत व्हॉईस ऑफ मीडियाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी रविकिरण चौगुले आणि स्वप्निल कांबळे, संघटनेचे राज्य संघटकपदी अजित लटके, राज्य संघटकपदी शहाहुसेन मुल्ला, राज्य कार्यकारिणी सदस्यपदी संतोष काटकर व संजयसिंह कांबळे याचबरोबर कोल्हापूर विभागीय कार्यकारणी सदस्य म्हणून तौसिफ सनदी व उत्तम पाटील यांची निवड करण्यात आली. तसेच सोशल मीडिया प्रमुख म्हणून रोहन हेरलगे व संतोष मोकाशी यांची एकमताने निवड करण्यात आली.

या निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. नूतन पदाधिकाऱ्यांनी आपल्यावर दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडू व संघटनेचा नावलौकिक वाढविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करु असे मनोगत व्यक्त केले. संघटनेतर्फे पत्रकारांच्या, विद्यार्थीवर्गाच्या तसेच सर्वसामान्यांच्या समस्यांबाबत आवाज उठविण्याचा ठराव यावेळी करण्यात आला. प्रत्येक शासकीय कामात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सर्वच पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे कबनूर शहराध्यक्ष अजित लटके यांनी नुकतीच एलएलबी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यानिमित्त संघटनेतर्फे अजित लटके यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कायदेशीर अडचणी सोडविण्यासाठी व संघटना भक्कम करण्यासाठी माझी नेहमीच मदत राहील असे लटके यांनी अभिवचन दिले. या बैठकीस संघटनेचे शहराध्यक्ष निखिल भिसे, सदस्य बाळासाहेब पाटील, शैलेंद्र चव्हाण, कमलाकर जाधव, सद्दामहुसेन मुल्ला आदि सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *