
इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनानिमित्त आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार महानगर पालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यामध्ये शुक्रवार दिनांक २७ जून रोजी इचलकरंजी शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांची शिखर संस्था असलेल्या मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी (MAI) यांच्या सहकार्याने शहरातील नागरिकां साठी (मधुमेह , रक्तदाब) आरोग्यशिबिराचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठवैद्यकीय व्यावसायिक डॉ.एम.ए. बोरगावे होते. या आरोग्य शिबिरामध्ये डॉ.एस.पी.मर्दा, वैद्यकीय अधीक्षक डॉ भाग्यरेखा
पाटील, डॉ.सॅम्युएल भंडारे, डॉ.श्रीमती कोळी, डॉ.संचिता काजवे, डॉ.मगदुम, डॉ.ए.के. चौगुले ,इ.एस.आय. रुग्णालयाचे डॉ . जावडेकर, माई चे अध्यक्ष डॉ.नितिन जाधव आदींनी सहभाग घेतला. या आरोग्य शिबिराचा लाभ शहरातील जवळपास १०३ नागरिकांनी घेतला.
तसेच शहरातील दंत चिकित्सक डॉ.अभिषेक मोरे (MDS) आणि डॉ.किरण मोरे (MDS) यांच्या सहकार्याने महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्या साठी दंत चिकित्सा शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिराचा जवळपास १५० अधिकारी कर्मचारी यांनी लाभ घेतला.
आजच्या दोन्ही आरोग्य शिबीराचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, सहा आयुक्त विजय राजापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
आरोग्य शिबीराचे आयोजनासाठी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी विशेष परिश्रम घेतले.

