
इचलकरंजी शहरातील दुर्गामाता प्रतिष्ठान आणि स्वामी समर्थ केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर वारीच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातील बरड गावाजवळ पालखी मार्गावर २५,००० भाकरी आणि उपवासाच्या साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये पाणी, बिस्किटे, पिठलं-भाकरी, चिवडा, भडंग, राजगिऱ्याचे लाडू, उपवासाचे वाणीसाहित्य यांचा समावेश होता. संत तुकाराम महाराज पालखी आणि वारी मार्गावरील वारकऱ्यांची सेवा हाच मुख्य उद्देश ठेवून, विविध सामाजिक संस्थांनीही या सेवाकार्यात योगदान दिले. हजारो वारकऱ्यांना या उपक्रमामुळे वारी दरम्यान मोठा दिलासा मिळाला. या सेवाकार्याबद्दल उपस्थित वारकऱ्यांनी आयोजकांचे विशेष आभार मानले. इचलकरंजी शहरातून दरवर्षी या स्वरूपाचा उपक्रम राबवला जातो, आणि सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या कार्यकर्त्यांची भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरते. या उपक्रमासाठी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा. विक्रमजी पावसकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभागीय संघचालक भगतरामजी छाबडा, संतोष हत्तीकर, तानाजी रावळ, चंद्रकांत वासुदेव, चंद्रकांत इंगवले, विश्वनाथ मुसळे, जयकुमार पटेल, चंद्रकांत जासूद, बसवराज कलबुर्गी, रावसाहेब कदम, तात्या पुजारी, शाहीर जावळे, राजू बर्गे, श्रेणिक शिदनाळे, सुधाकर कुलकर्णी, मीना माने, शेटके ताई आदी मान्यवरांनी विशेष उपस्थिती लावली