
दिनांक 1 जुलै रोजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्या कडे सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांन निवृत्त पश्चात प्रायव्हेट फंड ग्रॅज्युएटी शिल्लक हक्काचा रजेचा पगार इत्यादी लाभ मिळण्यास विलंब होत असल्याने
निवृत्ती पश्चात कर्मचा-याचे उदरनिर्वाहाचे साधन असते. कर्मचा-यांच्या कर्जावारील व्याजाची रक्कम वाढत आहे. तसेच त्या पैशामधूनच कर्मचारी आपले औषध उपचार करतो. तर वेळेत लाभ न मिळाल्यास त्याची आर्थिक परिस्थिती ढासाळू शकते.अशा आशयाचे
निवेदन उमाकांत दाभोळे उपाध्यक्ष भाजपा यांनी आयुक्तसो पल्लवी पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले होते. यांची त्वरित दखल घेत आयुक्त यांनी संबंधित विभागाची बैठक घेऊन आढावा घेण्यात आला होता या बैठक मध्ये मा आयुक्तसो यांनी लेखापरीक्षण व लेखापाल तसेच आस्थापना विभाग यांना आदेश देऊन सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांची सेवा निवृत्ती पश्चात लाभ प्रकरण तातडीने निर्गत करण्याचे आदेश दिले होते त्या नुसार आज पहिल्या टप्प्यात 23 सेवा निवृत्ती कर्मचाऱ्यांच्या खात्यात भविष्य निर्वाह निधी फंडाचे एक कोटी आठ लाख सत्तावीस हजार तेरा रुपये /-रु जमा झाले. यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समाधान व्यक्त होत आहे तसेच लवकरात लवकर सर्व कर्मचारी सेवानिवृत्त पश्चात लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करत रहाणार असलेले उमाकांत दाभोळे यांनी सांगितले