DBT पोर्टलमधील तांत्रिक त्रुटींमुळे संजय गांधी निराधार योजनेच्या 5 हजार लाभार्थ्यांना 8 महिन्यांपासून अनुदान मिळाले नाही; जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन

संजय गांधी निराधार याेजनेतील पात्र लाभार्थी डीबीटी पाेर्टलमधील तांत्रिक त्रुटीमुळे 8 महिन्यांपासून अनुदानापासून वंचित आहेत. या संदर्भात लवकरात लवकर मार्ग काढून या लाभार्थ्यांचे थकीत अनुदान तातडीने खात्यावर जमा करावे यासह विविध अडचणीबाबत माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी जिल्हाधिकारी अमाेल येडगे यांनी भेट घेत प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. त्यावर जिल्हाधिकारी येडगे यांनी डीबीटी पाेर्टलमधील तांत्रिक त्रुटीबाबत आपण शासन दरबारी पाठपुरावा करुन लाभ मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली. त्याचबराेबर स्वस्त धान्य दुकानातील धान्यासाठी प्राप्त अर्जांची लवकर निर्गत हाेण्यासाठी इचलकरंजी पुरवठा कार्यालयात तातडीने दुसèया लाॅग इनची साेय करुन देण्याचे आदेश जिल्हाधिकारी येडगे यांनी संबंधितांना दिले.
इचलकरंजी शहरात स्वस्त धान्य दुकानाचा लाभ घेणाèया व्य्नतींची संख्या लक्षणीय असून माेठ्या प्रमाणात प्राप्त हाेणाèया अर्जांची अंमलबजावणी करण्यास इचलकरंजी पुरवठा कार्यालात मनुष्यबळ कमी पडत आहे. त्यामुळे कामे पूर्ण हाेण्यास विलंब हाेत असलेने लाभार्थ्यांच्या तक्रारी वाढत आहेत. त्याबराेबर संजय गांधी निराधार याेजनेतील जवळपास 5 हजार लाभार्थ्यांचे अनुदान थकीत असून डीबीटी पाेर्टलमधील तांत्रिक अडचणींमुळे त्यांना लाभ मिळण्यास विलंब हाेत असल्याबद्दल माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी येडगे यांनी भेट घेतली.
यावेळी माजी मंत्री आवाडे यांनी, सध्या इचलकरंजी पुरवठा कार्यालयात एकाच लाॅग इनवर काम चालू असलेनेत्यामध्ये विलंब हाेत आहे. प्रलंबीत असलेल्या शिधापत्रिकेच्या कामाची पूर्तता करण्यासाठी व नागरिकांना अन्नधान्य मिळावे यासाठी पुरवठा कार्यालयात आणखीन एक लाॅग इनची साेय करुन देण्यात यावी अशी मागणी केली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी तातडीने दुसèया लाॅग इनची साेय करुन देण्याबाबत संबंधितांना आदेश दिले.
त्याचबराेबर निराधारांना आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने संजय गांधी निराधार अनुदान याेजना अंतर्गत निराधार गरीब व गरजू लाभार्थ्यांना दरमहा अनुदान दिले जाते. त्या अंतर्गत संजय गांधी, श्रावणबाळ वृध्दापकाळ, इंदिरा गांधी विधवा, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ याेजनेतील पात्र 5 हजार लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 पासून डी.बी.टी. द्वारे अनुदानाची रक्कम थेट खात्यावर जमा केली जात आहे. परंतु, काही तांत्रिक त्रुटींमुळे मागील 8 महिन्यांपासून इचलकरंजी संजय गांधी याेजना कार्यालयातील लाभार्थ्यांना अनुदान मिळालेले नाही. तसेच राष्ट्रीय कुटूंब लाभ याेजना लाभार्थ्यांना देखील अलीकडील काळात लाभ मिळालेला नाही.8महिन्यांपासून अनुदान न मिळाल्याने या लाभार्थ्यांची आर्थिक कुचंबणा हाेत आहे. डी.बी.टी. द्वारे थेट खात्यावर अनुदान मिळण्यासाठी जी नाेंदणी करावी लागते, त्यासाठी नाेंदणी करताना एक ओ.टी.पी. येताे. परंतु, मागील 2 महिन्यांपासून ही नाेंदणीची लिंक बंद असलेने पात्र असुनही नाेंदणी करता येत नसलेने अनेक लाभार्थी लाभापासून वंचित राहत आहेत. या लाभार्थ्यांचे थकीत अनुदान मिळावे, डी.बी.टी. नाेंदणी झाल्यानंतर एकाच महिन्याचे अनुदान जमा हाेत असून उर्वरित न मिळालेले अनुदान फरकासहित मिळावे, मागील तीन मिटिंगमध्ये मंजूर असलेले सुमारे 4,500 लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या तारखेपासून फरकासहित अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा व्हावे, तसेच इंदिरा गांधी वृद्धापकाळ याेजनेतील लाभार्थ्यांचे जीवन प्रमाणपत्र (हयातीचा दाखला) ऑनलाईन करतेवेळी नाॅट रजिस्टर्ड असा मेसेज येत आहे. परंतु, हे सर्व पूर्वीचे लाभार्थी रजिस्टर्ड आहेत त्यामुळे त्याबद्दलची त्रुटी दूर करावी आदी मागण्या मांडल्या. त्यावर जिल्हाधिकारी येडगे यांनी या संदर्भात आपण शासन दरबारी पाठपुरावा करु असे सांगितले.
या शिष्टमंडळात प्रकाश दत्तवाडे, श्रीरंग खवरे, शशिकांत माेहिते, संजय केंगार, अनिल डाळ्या, शेखर शहा, रवी जावळे, राहुल घाट, काेंडीबा दवडते, सुखदेव माळकरी, रमेश पाटील, रामा पाटील, नजमा शेख, मंगल सुर्वे, सपना भिसे, अर्चना कुडचे, सीमा कमते आदींचा समावेश हाेता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *