
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव पदावर 2021 पासून कार्यरत असलेल्या शशांक बावचकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या जनरल सेक्रेटरी पदावर निवड करण्यात आली आहे. ही निवड अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेने करण्यात आली असून, जनरल सेक्रेटरी के. सी. वेणुगोपाल यांनी अधिकृत निवडीची घोषणा केली. बावचकर यांच्या कार्यतत्परतेचा आणि संघटन कौशल्याचा विचार करून त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे काँग्रेस पक्षाच्या राज्यातील संघटनात्मक कार्याला अधिक बळ मिळेल, असा विश्वास पक्षातील वरिष्ठांनी व्यक्त केला आहे. बावचकर यांच्या निवडीबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला असून, विविध ठिकाणी त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
श्री बावचकर यांनी सिंधुदूर्ग जिल्हा काँग्रेस सहप्रभारी व प्रभारी म्हणून काम संभाळले आहे,सध्या ते सिंधुदूर्ग व रत्नागिरी जिल्हा काँग्रेस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत, कर्नाटक विधानसभा निवडणुक प्रचारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती, कोकण पदविधर निवडणुकीसाठी समन्वयक म्हणुन देखील त्यानी काम पाहीले आहे मागील चार वर्षाचे काम पाहुन चिटणीस पदावरून सरचिटणीस म्हणून बढती देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. 1981 पासून विद्यार्थी संघटनेतुन कामास सुरवात केलेल्या श्री बावचकर यांनी 10 वर्षे अभ्यासू नगरसेवक म्हणून काम केले आहे, विधानपरिषदे मधील गटनेते माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचे नेतृत्वा खाली श्री बावचकर कार्यरत असून त्यांच्या निवडीने काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण झाला आहे.