इंटरनेट सेवा ठप्प; महानगरपालिकेचे ऑनलाईन कामकाज खोळंबले

सकाळपासून इंटरनेट सेवा विस्कळित; महानगरपालिकेची कामे ठप् आज सकाळपासून इंटरनेट सेवा विस्कळित झाल्याने नागरिकांसह महापालिका कार्यालयांचे कामकाज मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले आहे. विशेषतः महानगरपालिकेच्या विविध विभागांतील ऑनलाईन सेवा ठप्प झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
महानगरपालिकेतील मालमत्ता कर, पाणीपट्टी, जन्म-मृत्यू दाखले, बांधकाम परवाने, ई-ऑफिस प्रणाली, ऑनलाईन नोंदी व इतर डिजिटल कामकाज इंटरनेट अभावी अडचणीत आले. अनेक नागरिक विविध कामांसाठी महानगरपालिकेत आले असता सर्व्हर डाऊन असल्याचे सांगण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले.
इंटरनेट सेवा नेमकी कोणत्या तांत्रिक कारणामुळे विस्कळित झाली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी सेवा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे संबंधितांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, वारंवार होणाऱ्या इंटरनेट समस्येमुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या कडुन व नागरिकांनी संताप व्यक्त करत संबंधित सेवा पुरवठादार व प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *