
इचलकरंजी हे वस्त्राेद्याेगाचे प्रमुख केंद्र असून शहरात दाखल हाेणाèया प्रमुख 5 मार्गावर स्वागत कमानी उभाराव्यात. त्यामुळे शहराची ओळख अधिक उठून दिसेल, अशी मागणी राहुल आवाडे विद्यार्थी संघटनेच्या वतीने आमदार राहुल आवाडे यांच्याकडे करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे मँचेस्टर अशी ओळख असलेल्या इचलकरंजीने औद्याेगिक, व्यायसायिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व पर्यटन क्षेत्रातही नांवलाैकिक मिळविलेला आहे. शहराची ही ओळख ठळकपणे दिसण्यासाठी शहरात दाखल हाेणाèया पाच प्रमुख मार्गावर स्वागत कमान उभारण्याची गरज आहे. शहरात दाखल हाेण्यासाठी काेल्हापूर-इचलकरंजी मुख्य मार्ग, हातकणंगले-इचलकरंजी. जयसिंगपूर-इचलकरंजी, नदीवेस नाका-इचलकरंजी आणि टाकवडे-इचलकरंजी हे पाच मुख्य मार्ग आहेत. शहराची लाेकसंख्या सातत्याने वाढत असून, औद्याेगिक, व्यावसायिक आणि पर्यटन क्षेत्रातील विकासाच्या दृष्टीने शहराला आधुनिक आणि भव्य स्वरुप प्रदान करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी काेल्हापूर नाका, जय सांगली नाका, स्टेशन राेड, टाकवडे वेस व नदीवेस नाका या पाच ठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुहास कांबळे व शहराध्यक्ष फहिम पाथरवट यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे. या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करावा, असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी रवी रजपुते, राजू बाेंद्रे, नितेश पाेवार, शशिकांत माेहिते, प्रमाेद बचाटे आदी उपस्थित हाेते.