नाराजीच्या चर्चा, पण ‘मातोश्री’चा विश्वास कायम, ठाकरेंचं ‘मिशन मुंबई’

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. आपल्या राजकीय वाटचालीसाठी आणि पक्षाच्या अस्तित्वासाठी उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या निवडणुकीच्या रणनीतीला सुरुवात केली असून शिलेदारांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. पक्षात नाराज असल्याच्या कारणाने माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी विश्वास दाखवला आहे.

घोसाळकरांच्या नाराजीच्या चर्चा…

तेजस्वी घोसाळकर यांनी काही महिन्यापूर्वीच पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला होता. पक्षातील अंतर्गत वादामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर तेजस्वी या शिंदे गट अथवा भाजपात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, आपण पक्ष सोडल्याचे त्यांनी जाहीर केले होते. तर, दुसरीकडे माझ्या सूनेवर आणि माझ्यावर शिवसेना ठाकरे गट सोडून जाण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाचे उपनेते विनोद घोसाळकर यांनी म्हटले होते. त्यामुळे राजकीय वातावरण आणखीच गरम झाले होते. त्यातच भाजपचे वर्चस्व असलेल्या मुंबै बँकेच्या संचालकपदी तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते.

मात्र दोन दिवसांपूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी ‘मातोश्री’वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, आणि आपण पक्षातच कार्यरत राहणार असल्याचं स्पष्ट केलं. यानंतर त्यांच्या नेमणुकीची अधिकृत घोषणा करण्यात आली. ही नियुक्ती केवळ ठाकरे गटाच्या संघटनात्मक बळकटीकरणाचा एक भाग मानली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *