
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र यांनी सुरू केलेल्या १०० दिवस कृती कार्यक्रम जाहीर त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर साहेब यांच्या माध्यमातून व नगर रचना सहाय्यक संचालक वि.प. झगडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील नगररचना विषयक तक्रारी, सूचना, समस्या ज्या असतील त्या दि. २२ जुलै २०२५ पर्यंत प्रत्यक्ष, टपालद्वारे किंवा Adtp.kolhapurredift@gmail.com या ईमेलवर सूचना समस्या नोंदवा असे आवाहन केले होते. त्याप्रमाणे मा.उपनगराध्यक्ष रवी रजपुते, विलास मामा गाताडे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्र. १२मधील भोनेमाळ मधील ९ गल्ल्या, निकम चाळ व स्फूर्ती नगर परिसरातील नागरीकांचे शिष्टमंडळ जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख शिवाजी भोसलेसोl कोल्हापूर यांना क -१ शेरा प्रॉपर्टी कार्ड वरून काढावयासाठी निवेदन देण्यात आले. त्यावेळेस मा. उपनगराध्यक्ष रवी रजपुते म्हणाले,

प्रॉपर्टी कार्ड व ७/१२ वर क -१ शेरा असल्याने भूखंड धारकांना खरेदी – विक्री, ले आउट (नकाशा) मंजूर करणे, बांधकाम परवाना मिळणे, बँकेचे कर्ज मिळत नसल्याने इचलकरंजी शहरातील असंख्य नागरिकांवर अन्याय होत आहे. तरी आमचा प्रभाग क्र. १२ भोनेमाळ मधील ९ गल्ल्या या ठिकाणी सर्वे करून प्रॉपर्टी कार्ड, ७/१२ वरील क -१ शेरा कमी करून मिळावा अशी विनंती केली. शेवटी मा. उपनगराध्यक्ष रवी रजपुते म्हणाले, क -१ शेरा कमी करण्यासाठी आम. डॉ. राहुल आवाडे, खास. धैर्यशील माने, मा. आम प्रकाशराव आवडे, मा.आम.सुरेशराव हाळवणकर, जिल्हाध्यक्ष रविंद्र माने यांनी लक्ष घालावे.
त्यावेळेस मा. नगरसेवक विलास मामा गाताडे, अमित गाताडे, जयवंत चव्हाण, अरुण मस्कर, आशु माने, ओमकार कांबळे, शब्बीर नदाफ, रणजीत शिंदे, सौरभ पवार व भागातील असंख्य नागरिक उपस्थित होते.