‘पंचायत’च्या चौथ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होते. अखेर पंचायत 4 प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. पंचायतचा पहिला सीझन 2020मध्ये आला होता तेव्हापासूनच या सीरिजला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. सीरिजची स्टोरी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. सीरीजची सर्वात खास गोष्ट म्हणजे प्रेक्षक त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह पाहता येते. अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पंचायतचे सगळे सीझन पाहू शकता. पंचायत सीझन 3 गेल्या वर्षी मे महिन्यात रिलीज झाला होता. वर्षभरात पंचायतचा चौथा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तर चला पाहूयात ‘पंचायत’ चा चौथा सीझन कसा आहे? यावेळी त्याने पूर्वीपेक्षा जास्त रंगत आणली आहे का?
पंचायच 4 चे यावेळी 8 एपिसोड्स
‘पंचायत’ चा तिसरा सीझन फाकौलीचे आमदार चंद्रकिशोर ‘चंदू’ सिंग (पंकज झा) आणि भूषण उर्फ बनारकस (दुर्गेश कुमार) यांच्यातील भांडणं आणि गोळीबाराने संपला होता. आता चौथा सीझन तिथून सुरू होतो. चौथ्या सीझनचे 8 एपिसोड आहेत. चौथ्या सीझनची कथा लहान असल्याने हा सीझन थोडा स्लो आहे. निर्मात्यांनी तो 8 एपिसोडमध्ये बनवून त्याची गती मंदावली आहे. यावेळी संपूर्ण सीझन फुलेरा पंचायत निवडणुकीवर आधारित आहे. या सीझनमध्ये बनारकसने प्रधानजी आणि सचिवजी (जितेंद्र कुमार) यांचं जगणं कठीण केलं आहे. कारण त्यांची पत्नी क्रांती देवी (सुनीता राजवार) पंचायत निवडणुकीत प्रधानजींच्या पत्नी मंजू देवी (नीना गुप्ता) विरुद्ध उभी आहे. दुसरीकडे यावेळी बिनोद (अशोक पाठक) यांना खूप स्क्रिन प्रेझेन्स मिळाला आहे.