तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीत आपले अभिनय कौशल्य सिद्ध करणारे प्रसिद्ध अभिनेते श्रीकांत ज्यांना श्रीराम म्हणूनही ओळखले जात होते. सध्या ते चुकीच्या कारणांमुळे चर्चेत आले आहेत. श्रीकांत यांचे नाव ड्रग्ज प्रकरणात आले असून त्यांना 7 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे.
साऊथ चित्रपटसृष्टीत अनेक ड्रग्जची प्रकरणे समोर आली आहेत. मल्याळम चित्रपटसृष्टीशी संबंधित अनेक प्रसिद्ध कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. आता तमिळ-तेलगू अभिनेते श्रीकांत हे देखील या प्रकरणात अडकले आहेत.
श्रीकांत यांना पोलिसांनी चेन्नई येथून 23 जून 2025 रोजी ड्रग्जशी संबंधित एका प्रकरणात चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. त्यांना चौकशीसाठी नुगम्बाक्कम पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाण्यात आले आहे. यावेळी त्यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी घेण्यात आले होते. पोलिसांना तपासात काही महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. त्यानंतर पोलिसांकडून अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे. 7 जुलैपर्यंत श्रीकांत यांना न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे.