विद्यार्थिनीच्या खोलीत घुसून अश्लिल कृत्य केल्याप्रकरणी इंग्लंडमधल्या भारतीय विद्यार्थ्याला शिक्षा सुनावण्यात आली आहे. नॉर्थम्ब्रिया विद्यापीठात सिव्हिल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असलेल्या उत्कर्ष यादव याने गैरकृत्याची कबुली दिली आहे, त्यानंतर त्याला शिक्षा सुनावली गेली आहे.
उत्कर्ष यादव याने विद्यापीठातच शिकत असलेल्या त्याच्या सहकारी विद्यार्थिनीच्या खोलीत घुसून तिचं बेड कव्हर आणि टेडी बेअरवर हस्तमैथुन केल्याचा आरोप आहे. गेल्या वर्षी ख्रिसमसच्या सुट्टीमध्ये विद्यार्थिनी जेव्हा घरी गेली होती, तेव्हा ही घटना घडली. उत्कर्ष यादवने जिम की कार्ड वापरून विद्यार्थिनीच्या खोलीमध्ये अनधिकृतरित्या प्रवेश केला होता.
विद्यार्थिनीच्या खोलीमध्ये गेल्यानंतर उत्कर्ष यादवने बेड कव्हर आणि तीन जेलीकॅट डेटी बेअरवर हस्तमैथुन केलं. जानेवारी महिन्यात विद्यार्थिनी परत आली तेव्हा तिला तिच्या बेडवर आणि खेळण्यांवर डाग दिसले