
उद्याेगांची उभारणी करुनही बांधकाम परवाना संदर्भातील केलेल्या सुधारणेमुळे 10 वर्षापासून विस्तारीकरण आणि 5 टक्के व्याजदर अनुदान बंद झाल्याने अडचणीत आलेल्या वस्त्राेद्याेगाचा प्रलंबित प्रश्न दूर झाला आहे. शासन दरबारी पाठपुरावा करुन हा प्रश्न साेडविल्याबद्दल एअरजेट लूम ओनर्स असाेशिएशनच्या वतीने आमदर राहुल आवाडे यांचा सत्कार करत अभिनंदन करण्यात आले. या निर्णयामुळे सर्वच यंत्रमागधारक आणि वस्त्र उद्याेजकांना दिलासा मिळाला आहे.
सामुहिक प्राेत्साहन याेजना 2013 अंतर्गत ग्रामीण भागात उद्याेग उभारणी अथवा विस्तारीकरणासाठी ग्रामपंचायतीचा बांधकाम परवाना ग्राह्य धरला जात हाेता. परंतु त्यामध्ये सुधारणा करत 15 मे 2015 पासून टाऊन प्लॅनिंगचा (टीपी) परवाना बंधनकारक केल्याने माेठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेल्या आणि अत्याधुनिक यंत्रमाग उद्याेजकांसमाेर माेठी समस्या निर्माण झाली हाेती. या निर्णयासाेबत सामुहिक प्राेत्साहन याेजना 2013 अंतर्गतच मिळणारे 5 टक्के व्याज अनुदानसुध्दा थांबविण्यात आले हाेते. याेजनाच रखडल्यामुळे नवउद्याेजकांसह विस्तारीकरण करर्णाया उद्याेजकांचेही अनुदान प्रलंबित राहिले हाेते. या संदर्भात तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे यांनी मागील दहा वर्षापासून शासन दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला हाेता. तर बैठक घेऊन हा प्रश्न साेडवून निर्माण झालेला संभ्रम दूर हाेण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रमागधारक संघटनांनी सातत्याने मागणी लावून धरली हाेती. त्यानुसार उद्याेगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात 3 एप्रिल 2025 राेजी बैठक झाली. अनब त्या निर्णयाचा अध्यादेश जारी नुकताच जारी झाला. त्यामुळे यंत्रमाग उद्याेगातील माेठी अडचण दूर झाली आहे. या निर्णयाचा शेकडाे उद्याेजकांचा रखडलेला प्रश्न सुटला असून व्याज अनुदान मिळण्याचा मार्ग माेकळा झाला आहे.
या निर्णयाबद्दल आमदार राहुल आवाडे यांचा एअरजेट लूम ओनर्स असाेसिएशनचे प्रेसिडेंट राजगाेंडा पाटील यांच्या हस्ते सत्कार करत आभार व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी उपाध्यक्ष प्रकाश गाैड, संचालक नरेंद्र कनाेजे, विजय पुराेहित, सुशिल मगदूम यांच्यासह कारखानदार अमाेल कानवडे शरद देसाई व कारखानदार उपस्थित हाेते.