
सांगली जिल्ह्यातील मिरज येथे महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मिरज ते निलजी या रोडवर असणाऱ्या हायवे ब्रिजच्या खाली सुगंधी तंबाखूची विक्री करण्यासाठी एक आयशर येणार असल्याची माहिती महात्मा गांधी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना मिळाली होती पोलिसांनी हि आयशर टेम्पो आडवून चालकाकडून माहिती घेतली असता यावेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आयशर टेम्पोमध्ये 570 किलो वजनाचा सुगंधी सुपारी सह तंबाखूजन्य पदार्थ आयशर टेम्पो असा सुमारे 11 लाख 2 हजार 600 रुपयाचा मुद्देमाल मिरज पोलिसांनी जप्त केला आहे यामध्ये आरोपी राजकुमार लिंगाप्पा बुदीहाळ राहणार यड्राव अरुण हुकीरे राहणार राजवाडा चौक रेहान मलिक मुल्ला राहणार शहापूर या तिघांना मिरज पोलिसांनी ताब्यात घेतल आहे व एक आयशर सह सुगंधी गुटखा जप्त करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस करत आहेत पण मिरज पोलिसांनी आयशर टेम्पो कोणाचा आहे? कायम सुगंधी तंबाखू विक्रीसाठी वापरला जातो का? याचा तपास करत आहेत पण टेम्पो चालकावर सुद्धा गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागली आहे ही कारवाई संदीप घुगे पोलीस अधीक्षक पोलीस उपाधीक्षक प्रणाली गेलडा पोलीस निरीक्षक संदीप शिंदे पोलीस निरीक्षक रूपाली गायकवाड संदीप गुरव अभिजीत धनगर अभिजीत कुंभार सर्जेराव पवार सुरज पाटील नानासाहेब चंदनशिवे राजेंद्र हारगे आदींनी कारवाई केली आहे