
इचलकरंजी शहरासह कोकण कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे शहरातील पंचगंगा नदीवर असणाऱ्या लहान पुलाला पुराचे पाणी घासू लागल्यामुळे इचलकरंजी महानगरपालिका व पोलीस प्रशासनाने वाहतुकीसाठी हा पूल दुसऱ्यांदा बंद करण्यात आला आहे सध्या मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे
इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे धरणपाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे धरणातून पाणी मोठ्या प्रमाणात सोडले जात आहे राधानगरी मलकापूर यादी भागांमध्ये अति मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे राधानगरी काळम्मावाडी धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे सध्या राधानगरी धरणातून ३000 क्युसेस ने नदीपात्रात पाणी सोडले जात आहे याच अनुषंगाने कर्नाटक व महाराष्ट्राला जोडणारा पंचगंगा नदीवरील लहान पूल इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनाने वाहतूकीसाठी दुसऱ्यांदा बंद करण्यात आली आहे पुलाला खाली पाणी घासू लागल्यामुळे महापालिका व पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे सध्या इचलकरंजी पंचगंगा नदीची सध्या पाणी पातळी 55.3 इंच इतकी आहे तर इशारा पातळी 68 आहे आपत्ती व्यवस्थापनाकडून पूरग्रस्त नागरिकांना सूचना ही देण्यात येत आहे पावसाचा जोर असाच राहिला तर कृष्णा आणि पंचगंगा नदीला महापूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच अलमट्टी धरण सुद्धा 68 टक्के भरले आहे अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग होऊ लागला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तसेच आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले आहेत