
इचलकरंजी महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत शहरामध्ये ३ ते ५ दिवसातून एकदा आणि तोही कमी दाबाचा पाणी पुरवठा होत असतो. शहरामध्ये कृष्णा पाणी पुरवठा योजना (मजरेजवाडी) येथून ३६ एमएलडी तर पंचगंगा पाणी पुरवठा योजना येथून ९ एमएलडी इतका मुबलक उपसा होत असताना शहरास पाणी टंचाई भासत आहे.इचलकरंजी
महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून २०१६ रोजी जलपरिक्षण (वॉटर ऑडीट) करणेत आलेचे असे समजते तसे असेल त्या बद्दलची माहिती मिळावी. तसेच कृष्णा पाणी पुरवठा योजना ( मजरेजवाडी) व तर पंचगंगा पाणी पुरवठा योजना उपसा व वितरण लेखा जोख्याची ही देखील माहिती मिळावी.
कृष्णा पाणी पुरवठा योजना (मजरेजवाडी) व पंचगंगा पाणी पुरवठा योजना येथून उपसा करणेत येणाऱ्या अशुध्द पाणी पुरवठ्याची पाईपमध्ये किती गळती आहे. तसेच सध्या वितरण व्यवस्थेमध्ये सुरु असलेल्या गळत्यांबाबत कोणतेही परिक्षण किंवा किती पाणी वाया जाते. या बाबतचा लेखाजोखा पाणी पुरवठा विभागाकडे वारंवार विचारणा करुन देखील त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. या उपकेंद्राकडुन येणारी अशुध्द पाणी पुरवठयाची लाईन ही टाकवडे, शिरढोण मार्गातुन येत असुन या मार्गी २०% ते २५% पाणी पाईप मधून गळती होत असते.
कृष्णा व पंचगंगा पाणी उपसा व वितरण याचे लेखाजोखा तसेच शहरातील वितरण व्यवस्थेतील व्हॉल्व गळती व जुन्या पाईपलाईनवर असलेले कनेक्शन यावर उपाययोजना केलेस जवळ जवळ २०% ते ३०% पाणी गळतीचे प्रमाण कमी होणार आहे. तसेच पाण्याच्या टाक्या भरून बंद न झालेमुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. त्यासाठी उपाययोजना म्हणून स्कॉडा बटरफ्लाय व्हॉल्व ऑनलाईन पध्दतीचे यंत्रणा बसविणेत यावे. जेणेकरुन वाया जाणारे पाणी वाचले जाईल.
पाणी उपसा मध्ये असणारे गळत्यांचे प्रमाण, पाणी वितरण व्यवस्थेमध्ये वारंवार होणा-या गळत्या व घाण पाणी लागणेचे वाढलेले प्रमाण तसेच जलपरिक्षण (वॉटर ऑडीट होणे गरजेचे आहे. तसे तातडीने आदेश संबंधित विभागास व्हावे. जेणेकरुन पाणी उपसा, वितरण व गळत्यांचे सुसुत्रता आणता येईल. व शहरावासियांना पाणी टंचाईपासून दिलासा मिळेल या आशयाचे निवेदन उमाकांत दाभोळे यांनी आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या कडे निवेदन द्वारे मागणी केली आहे