
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ‘सक्षम तू अभियान’ अंतर्गत सोमवार 28 जुलै रोजी दुपारी 3.00 वाजता अशोका सायझिंग गणेशनगर येथे
विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रूपाली चाकणकर या अध्यक्षस्थानी असणार आहेत.
या शिबिरात शहापूरचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक किशोरी साबळे हे महिलांचे संरक्षण, सक्षमीकरण, निर्भया पथक व त्यांचे टोल फ्री क्रमांक आधी विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-असुर्लेकर, कार्याध्यक्ष अनिल साळुंखे, कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष सौ. शितल फराकटे, माजी आमदार अशोकराव जांभळे, कार्याध्यक्ष अमित गाताडे आदींसह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी भागातील महिला व मुलींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे यांनी केले आहे.