
इचलकरंजी शहरास वाढीव भागासाठी मुबलक पाणीपुरवठा होणेसाठी तत्कालीन मा. आमदार श्री. प्रकाश (आण्णा) आवाडे यांनी सतत मा. राज्य शासनाकडे पाठपुरावा करून महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेतून ६ जलकुंभ व दाबनलीका टाकणे, पंपिंग मशिनरी उभारणे तसेच इतर अनुषंगिक कामासाठी मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेव, मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेव, मा. अजित पवार साहेब यांच्या सहकार्याने रुपये 31 कोटी 37 लाख रुपये मंजूर केले आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यासह तीन महिन्यांत कार्यादेश देण्याबाबत मा. शासनाने बंधनकारक केले आहे. काम पूर्ण करण्याचा कालावधी 18 महिन्यांचा असून दरम्यान जीवन प्राधिकरणकडून या जलकुंभउभारणीकामी विलंब होत असल्याने मा. आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्या नंतर सदर काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडून इचलकरंजी महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यानंतर दि.२२/०५/२०२५ रोजी निविदा प्रक्रिया झालेनंतर बराच कालावधी पूर्ण झाला आहे. तरी ६ जलकुंभ उभारणीकामी त्वरीत कार्यादेश देऊन प्रत्यक्ष जलकुंभ व इतर अनुषंगिक कामाला सुरुवात करावी जेणेरून इचलकरंजी शहरातील वाढीव भागातील लोकांना दैनंदिन मुवलक व स्वच्छ पाणी पुरवठा करता येईल. तरी सदरची कार्यवाही आपलेकडून तात्काळ करणेत यावी ही मागणी निवेदनाद्वारे मागणी दाभोळे यांनी केली आहे
जलकुंभ उभारणी ठिकाण
पि. बा. पाटील मळा ११ लाख लिटर्स क्षमता
शांतीनगर १० लाख लिटर क्षमता
जवाहरनगर १४ लाख लिटर क्षमता
जुना चंदूर रोड ८ लाख लिटर क्षमता
तोरणानगर १३ लाख लिटर क्षमता
तुळजाभवानीनगर – १२ लाख लिटर क्षमता