
इचलकरंजी शहरासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढीसाठी मोठ्या बैठकांचे सत्र सुरू आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यांमध्ये शिवसेना मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघ कोल्हापूर मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची गाठीभेटी घेऊन येणाऱ्या महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार उभे करून जास्तीत जास्त शिवसेनेचे उमेदवार निवडून आणायचे आहे ज्या ठिकाणी महायुती होईल त्या ठिकाणी महायुती म्हणून लढायचे आहे तर ज्या ठिकाणी स्वतंत्र लढायचे आहे त्या ठिकाणी स्वतंत्र लढले जाईल महायुतीचा धर्मही पाळला जाईल पण शिवसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही खेडोपाडी शिवसेना वाढवणार शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना वाढवणार सर्वसामान्य पर्यंत शिवसेनाची ध्येयधोरणे नेणार येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यातील बरेचश्या नेत्यांचा शिवसेनेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कोणता बदल होणारअ आहे जिल्ह्याला कणखर नेता म्हणून जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्याकडे पाहिले जाते. M मराठी विशेष रिपोर्ट निखिल भिसे