स्व.माजी आमदार डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांच्या जयंतीनिमित्त श्री दत्त साखरच्या वतीने विनम्र अभिवादन

कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे शिल्पकार शिरोळ तालुक्याचे भाग्यविधाते आणि श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी चेअरमन, माजी आमदार स्व. डॉ आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटीलसाहेब यांची जयंती श्री दत्त साखर कारखान्याच्या मुख्य कार्यालय इमारती समोर उभारण्यात आलेल्या पूर्णाकृती पुतळ्यास विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव आप्पासाहेब पाटील यांनी स्व. डॉ आप्पासाहेब उर्फ सारे पाटील पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्याचप्रमाणे स्व. दत्ताजीराव कदम यांना यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास चेअरमन रघुनाथ देवगोंडा पाटील यांनी,स्व. दिनकरराव यादव यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व्हाईस चेअरमन शरदचंद्र विश्वनाथ पाठक यांनी व विश्वासराव घोरपडे सरकार यांच्या पुतळ्यास संचालक अमर बाबाजी यादव यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित सर्व संचालक व इतर मान्यवरांनी पुष्प कमल अर्पण करून अभिवादन केले.

तसेच याप्रसंगी दत्त तोडणी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर, रेणुका भक्त मंडळ शिरोळचे अध्यक्ष दिलीप माने, पंचगंगा कारखान्याचे संचालक प्रताप उर्फ बाबा पाटील, दादासो पाटील संतोष जाधव पंकज गुरव विकास कांबळे यांनी स्व. डॉ आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कारखान्याच्या संचालिका श्रीमती विनया घोरपडे, संचालक अरुण कुमार देसाई,अनिल कुमार यादव बाबासो पाटील, विश्वनाथ माने शेखर पाटील बसगोंडा पाटील, एडवोकेट प्रमोद पाटील, निजामसो पाटील, दरगु माने गावडे,ज्योती कुमार पाटील, सिदगोंडा पाटील,सुरेश कांबळे इंद्रजीत पाटील,रणजीत कदम, संचालक महेंद्र बागे, विजय सूर्यवंशी, मलकारी तेरदाळे, बाळासाहेब पाटील हालसवडे, रावसाहेब नाईक, अनंत धनवडे, मंजूर खान मिस्त्री कामगार संचालक प्रदीप बनगे कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांचे सर्व खाते प्रमुख कर्मचारी उपस्थित होते.

तसेच ज्येष्ठ साहित्यिक सुभाष धुमे, माजी कामगार अध्यक्ष रावसाहेब भोसले, सुदर्शन कदम,माजी सरपंच गोरखनाथ माने, रघु मेत्रे, बापू परीट नगरचे सरपंच अमोल चव्हाण,बाळासाहेब कोळी,भाऊसाहेब पाटील नीलम माणगावे,दीपक कांबळे, शितल उपाध्ये,संजय गुरव,ऋषिकेश शिंदे काशीम मुलानी,महादेव कुलकर्णी पंडित काळे बापूजी,कुमार गुरव,जयसिंगपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक संजय पाटील कोथळीकर उद्योगपती अशोकराव कोळेकर, राजू हरलीकर, महाराष्ट्र व कर्नाटकातील कारखान्याचे सभासद,कार्यकर्ते, तसेच कामगार युनियन, कामगार सोसायटीचे सर्व पदाधिकारी, आप्पासाहेब उर्फ सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,आयटीआयचे प्राचार्य सर्व शिक्षक वर्ग, पदाधिकारी तसेच डॉ. आप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव बँक व दत्त भंडार ग्राहक संस्थेचे सर्व संचालक पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *