तारदाळ येथील यंत्रमाग कारखान्यात लिफ्ट आणि भिंतीत अडकून १९ वर्षीय परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

इचलकरंजी शहरालगत असणार्या  तारदाळ  येथील यंत्रमाग कारखान्यात काम करताना लिफ्ट आणि भिंतीच्या मध्ये सापडून झालेल्या दुर्घटनेत परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला. कन्हैय्याकुमार शिवशंकर यादव (वय 19 मुळ रा. रसुलपूर धुरीया बिहार सध्या खाेतवाडी) असे त्याचे नांव आहे. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. मन्नुकुमार रामेन्द्र यादव (मूळ रा. गंगापूर बिहार सध्या खाेतवाडी) याने दिलेल्या िफर्यादीवरुन या घटनेची नाेंद शहापूर पाेलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
 , तारदाळ येथील श्रीरामनगर गल्ली नं. 9 याठिकाणी दिपश्री टेक्स्टाईल नामक यंत्रमाग कारखाना आहे. याठिकाणी कन्हैय्याकुमार यादव हा परप्रांतिय तरुण कामास हाेता. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ताे कारखान्यात काम करीत हाेता. साहित्य ने-आण करणाèयासाठी वापरली जाणारी लिफफ्ट आणि भिंत यांच्यामध्ये कन्हैय्याकुमार हा अडकला. त्यामध्ये त्याच्या गुप्तभागास व पाठीस गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी शहापूर पाेलिसात अपघाताची नाेंद करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *