इचलकरंजीत दहन-दफन निधी योजना पुन्हा सुरू; येत्या महासभेच्या विषयपत्रिकेवर प्रस्ताव सादर भाजपा उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे

इचलकरंजी : शहरातील नागरिकांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणारी मोफत दहन-दफन निधी योजना पुन्हा सुरू करण्यासाठी महानगरपालिकेच्या आगामी ३० एप्रिल रोजी होणाऱ्या महासभेत विषयपत्रिकेवर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर त्वरित अंमलबजावणी होत असून, त्यासाठी प्रशासनाकडून 60 लाखाची आर्थिक तरतूद बजेटमध्येही करण्यात आले आहे या निर्णयामुळे शहरात समाधानाचे वातावरण आहे.
भाजपा इचलकरंजीचे उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी या योजनेच्या पुनरुज्जीवनासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. वाढत्या महागाईमुळे अंत्यसंस्काराचा खर्च सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जात असल्याने, ही योजना पुन्हा सुरू करण्याची त्यांची मागणी होती. त्यांनी प्रशासनाकडे निवेदन देत नागरिकांच्या अडचणी अधोरेखित केल्या होत्या

या पार्श्वभूमीवर महापौर, आयुक्त, उपमहापौर तसेच विरोधी पक्षनेते यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, योजनेचा प्रस्ताव महासभेच्या विषयपत्रिकेत समाविष्ट करण्यात आला आहे. महासभेत यावर चर्चा होऊन लवकरच अंतिम मंजुरी मिळणार आहे.
प्रस्तावानुसार, दहन-दफनासाठी नागरिकांना निश्चित आर्थिक मदत दिली जाणार असून, प्रक्रिया सुलभ व पारदर्शक करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच ही योजना सर्व नागरिकांसाठी समानपणे लागू राहील, असा प्रयत्न लोकप्रतिनिधी व प्रशासनाचा आहे.
या सकारात्मक घडामोडीबद्दल शहरवासीयांच्या वतीने महापौर, आयुक्त, उपमहापौर व विरोधी पक्षनेते यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत. तसेच उमाकांत दाभोळे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचेही यश आहे.
एकूणच, महासभेच्या विषयपत्रिकेवर प्रस्ताव सादर होणे हा महत्त्वाचा टप्पा असून, मंजुरीनंतर ही योजना नागरिकांना मोठा दिलासा देणारी ठरणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *