
शिरोळचे माजी आमदार स्व.आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त दत्त साखर कारखाना शिरोळच्या कार्यस्थळावर बुधवार दिनांक 11 डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक सुभाष धुमे,श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील, चेअरमन रघुनाथ पाटील, व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, कार्यकारी संचालक एम व्ही पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले. सदरचे रक्तदान शिबिर शर्करा औद्योगिक श्रमिक संघ (इंटक), श्री दत्त साखर कारखाना ली. चॅरिटेबल ट्रस्टचे आरोग्य केंद्र व आचार्य तुलसी ब्लड बँक जयसिंगपूर आणि सिद्धिविनायक ब्लड बँक मिरज, उषःकाल ब्लड बँक सांगली, हिंदरत्न प्रकाश बापू पाटील ब्लड बँक सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 451 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या जयंतीनिमित्त केली 28 वर्षे शर्करा औद्योगिक श्रमिक संघ यांचे वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. या रक्तदान शिबिरामध्ये कारखान्याचे कर्मचारी,सभासद बंधू,चॅरिटेबल ट्रस्टकडील आयटीआय व आप्पासाहेब उर्फ सारे पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कडील विद्यार्थी तसेच परिसरातील कार्यकर्ते हितचिंतक यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग असतो. आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये गरजू रुग्णांना रक्ताची नितांत गरज असते अशा या रक्तदान शिबिरातून रुग्णांना मोलाची मदत शिबिराच्या माध्यमातून मिळत असते.
तसेच श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब यांच्या माध्यमातून नेत्रदानाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 42 लोकांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे या कार्यक्रमासाठी संचालिका विनया घोरपडे,संचालक शेखर पाटील, अरुणकुमार देसाई, विश्वनाथ माने, बसगोंडा पाटील, प्रमोद पाटील,निजामसो पाटील, अमर यादव दरगु माने गावडे, ज्योती कुमार पाटील, सिदगोंडा पाटील, सुरेश कांबळे, इंद्रजीत पाटील, रणजीत कदम, महेंद्र बागे, विजय सूर्यवंशी, बाळासाहेब पाटील, अनंत धनवडे, मंजूर मिस्त्री,युनियनचे सेक्रेटरी अरुण पाटील, उपाध्यक्ष संपत पाटील, विजय वाणी, तानाजी गावडे, धोंडीराम पाटील, आनंदा अंबुसकर, नाना कदम व कारखाना चारिटेबल ट्रस्ट, कामगार युनियन व कामगार सोसायटीचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत चारिटेबल ट्रस्टचे संचालक अंबादास नानीवडेकर व प्रास्ताविक डॉक्टर कुमार पाटील यांनी केले तर आभार कामगार संचालक प्रदीप बनगे यांनी मानले.