
महाराष्ट्रातील साखर व उपपदार्थ उद्योगातील सहकारी, खाजगी, भाडेतत्त्वावर, सहभागीदारी तत्त्वावर असणाऱ्या सर्व कारखान्यांना 10 टक्के वेतन वाढ करण्याबाबत अंमलबजावणी करणेकरता त्रिपक्ष समितीच्या वतीने शिफारशी करण्यात आल्या होत्या त्यास अनुसरून महाराष्ट्र राज्य साखर संघ व महाराष्ट्र शासन यांच्या निर्णयाप्रमाणे श्री दत्त साखर शिरोळ कारखान्याच्या व्यवस्थापनाने माहे नोव्हेंबर 2025 च्या पगारापासून दहा टक्के वेतन वाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्य पातळीवरील केलेल्या करारातील कलम 33 मधील तरतुदीनुसार मान्यताप्राप्त शर्करा औद्योगिक श्रमिक संघ (इंटक) शिरोळ व श्री दत्त साखर कारखाना यांच्यात वेतन वाढीचा करार करण्यात आला. सदर वेतन वाढीमुळे कामगारांच्या उत्साहाचे व आनंदाचे वातावरण आहे

सदर करार प्रसंगी कामगार संघटनेच्या वतीने दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील, चेअरमन रघुनाथ पाटील,व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, कार्यकारी संचालक एम. व्ही.पाटील यांचा सत्कार करण्यात आला व कारखाना व्यवस्थापनाचे आभार अध्यक्ष प्रदीप बनगे यांनी मानले. याप्रसंगी कामगार युनियनचे अध्यक्ष प्रदीप बनगे,उपाध्यक्ष संपत पाटील, जनरल सेक्रेटरी अरुण पाटील, एचआर मॅनेजर जयदीप देसाई, हेट टाइम कीपर राजेंद्र केरीपाळी, तसेच विजय वाणी, तानाजी गावडे, धोंडीराम पाटील, चंद्रशेखर कलगी, आनंद आंबुसकर,दत्ता गावडे यांचे सह पदाधिकारी, कारखान्याचे खाते प्रमुख, अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते