श्रीमंत गंगाबाई माईसाहेबांची 68 वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात संपन्न.

इचलकरंजी नगरीत आपल्या कार्यातून समाजात स्वतःचे नाव प्रसिद्ध करणाऱ्या माईसाहेबांची पुण्यतिथी “श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये” मोठ्या उत्साहात संपन्न झाली. नुकत्याच क्लास वन अधिकारी पदावरती विराजमान झालेल्या प्रमुख पाहुण्या व प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी मा.अपूर्वा पाटील यांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. संगीत शिक्षिका सौ.रानडे मॅडम व विद्यार्थिनींनीच्या गंगामाई पुण्यस्मरण गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रशालेतर्फे प्रमुख पाहुण्यांचा व पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सौ एस.जे.कुलकर्णी व सौ.पी.एस.कामत मॅडम यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. माईसाहेबांच्या पुण्यतिथी निमित्त देणगी देणाऱ्या देणगीदारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माई साहेबांचं व आजच्या प्रमुख पाहुण्यांचे चित्र रेखाटणारे चित्रकलेचे कडाळेसर यांचाही सत्कार करण्यात आला.
मा मुख्याध्यापिका सौ.ए.एस. काजी यांनी स्त्रियांनी फक्त साक्षर न होता विविध कार्य करून झटणारे कार्य करावे प्रमुख पाहुणे व माजी विद्यार्थिनी अपूर्वा पाटील ही माईंनी केलेल्या कार्याची पोच पावती आहे. असे प्रतिपादन स्वागत व प्रास्ताविकातून केले. “स्वप्न ठरवल्याप्रमाणे मी क्लासवन अधिकारी बनून माझ्या प्रशालेमध्ये मी प्रमुख पाहुणी म्हणून आले .पण मी या गंगामाईचीच लेक आहे शाळा शिकण हे फक्त ध्येय न ठेवता तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी कसं झटावं . हे आपण स्वतः कसं घडत गेलो “ या विषयी प्रमुख पाहुण्या म्हणून आलेल्या क्लासवन अधिकारी मा अपूर्वा भारती संजय पाटील यांनी विद्यार्थीनींना आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केले. श्री.ना.बा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.कृष्णाजी बोहरा यांनी सतत जनकार्यासाठी झटणाऱ्या व महिलांना सक्षम करणाऱ्या माई साहेबांना आपल्या अध्यक्षीय भाषणातून आदरांजली वाहिली .यावेळी कार्यक्रमाचे अहवाल वाचन विभाग प्रमुख सौ.जी.आर मंडलिक मॅडम यांनी केले.
पुण्यतिथी निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वाटप करुन विजेत्या स्पर्धकांचा सन्मान केला.
यावेळी संस्थेचे स्कूल कमिटी चेअरमन मा.श्री.मारूतराव निमणकर व विश्वस्त मा.श्री.अहमद मुजावर तसेच श्री संजय पाटील व भारती पाटील व माजी शिक्षक श्री पाटीलसर व सौ कवठेमॅडम तसेच मान्यवरांची उपस्थिती लाभली .
सूत्रसंचालन सौ. व्ही.डी.रावळ मॅडम यांनी केले तसेच आभार पर्यवेक्षिका श्रीम. एन.एम. कांबळे मॅडम यांनी मानले. या कार्यक्रमाप्रसंगी उपप्राचार्य श्री .व्ही.जी.पंतोजी सर ,उपमुख्याध्यापिका सौ.व्ही.एस. लोटके मॅडम, पर्यवेक्षक श्री .एस. एस .कोळी, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *